“सातारा कारागृहात भारतीय सेवक संगतीच्या माध्यमातून बंदीजनांसाठी संगीत, समुपदेशन व
आवश्यक साहित्य वाटप”
कोल्हापूर
भारतीय सेवक संगती, सातारा या संस्थेच्या वतीने कारागृहातील बंद्यांसाठी देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून समुपदेशन व सकारात्मक विचारांकडे पाऊल टाकून गुन्हेगारी प्रवृत्तीपासून दूर होण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून कारागृहातील बंदयांच्या मनोरंजनास देखील प्राधान्य देण्यात आले.
सदर कार्यक्रमातून बंदींना दैनंदिन जीवन जगत असताना जीवनातले चांगले व वाईट अनुभव गायक व लेखक श्री अजय चव्हाण यांनी सांगितले. तसेच गायक अजय चव्हाण यांनी गीतांच्या माध्यमातून देखील जीवनात आपले कुटुंबीय, आई, वडील हे देखील किती महत्त्वाचे असतात आणि त्यांनी आपल्यासाठी त्यांचे संपूर्ण जीवन व्यतीत केलेले असते. तेव्हा आपण आपले कर्तव्य सत्कर्म करूनच त्यांची सेवा करून करायचे असते, असा संदेश दिला.
भारतीय सेवक संगतीचे अध्यक्ष कृष्णात पाटील यांनी देखील कारागृहातील बंदींना गुन्हेगारी वृत्तीपासून दूर जाऊन समाजात आपले चांगले स्थान निर्माण करण्याबाबत संदेश दिला. भगवंताची पूजा, अर्चा आणि सत्कर्म यानेच आपले जीवन सुधारते व सार्थकी लागते हे देखील सांगितले. तसेच भारतीय सेवक संगतीच्या माध्यमातून कारागृहातील बंद्यांसाठी अनब्रेकेबल 100 नग फायबर प्लेट्स व 200 बाउल भेट मिळाल्या.
सदर कार्यक्रमास भारतीय सेवक संगतीचे अध्यक्ष कृष्णात पाटील, सुधाकर कांबळे, संजय गायकवाड, सतीश कमलाकर, देविदास पिल्ले, सचिन लोखंडे, विकास चंद्रनारायण, सचिन पोळ, अजय चव्हाण, ॲनी भोरे, नमिता भोरे, राजेश अलवा तसेच कारागृह अधीक्षक शामकांत शेडगे, वरिष्ठ तुरुंग अधिकारी ज्ञानेश्वर दुबे, राजेंद्र भापकर, सुभेदार मानसिंग बागल, हवालदार अहमद संदे, सतीश अब्दागिरे, प्रेमनाथ वाडेकर व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.