मुश्रीफांनी स्वतःच्या स्वार्थासाठी गडहिंग्लज साखर कारखाना बंद पाडण्याचे पाप केले* : *स्वाती कोरी* : लिंगनुर क।। नूल येथे समरजीतसिंह घाटगे यांच्या प्रचारार्थ सभा

Spread the news

*मुश्रीफांनी स्वतःच्या स्वार्थासाठी गडहिंग्लज साखर कारखाना बंद पाडण्याचे पाप केले*

: *स्वाती कोरी*

: लिंगनुर क।। नूल येथे समरजीतसिंह घाटगे यांच्या प्रचारार्थ सभा

गडहिंग्लज/प्रतिनिधी: गेली पंधरा वर्षे गडहिंग्लजसह उत्तुर-कडगाव- कौलगे मतदार संघातील जनतेने मुश्रीफांना मतदानाच्या माध्यमातून बळ दिले. त्या जनतेची अस्मिता असलेल गडहिंग्लजचा गोड साखर कारखाना स्वःताच्या स्वार्थासाठी बंद पाडण्याचे पाप हसन मुश्रीफांनी केले.असे प्रतिपादन जनता दलाच्या नेत्या सौ. स्वाती कोरी यांनी केले.

महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार समरजीतसिंह घाटगे यांच्या प्रचारार्थ लिंगनुर क।। नूल येथे आयोजित केलेल्या जाहीर प्रचार सभेत त्या बोलत होत्या.

सौ.कोरी म्हणाल्या,” गडहिंग्लज कारखाना स्वतःच्या हातात यावा म्हणून मुश्रीफांनी अविश्वास ठराव दाखल केला. यामध्ये ते यशस्वी झाले. मुश्रीफांची कंपनी असलेल्या ब्रिक्सने हा कारखाना चालवायला घेतला. कंपनीने करार पूर्ण होण्या अगोदरच दोन वर्षे कारखाना सोडला. त्यामुळे अडचणीत आलेल्या गोड साखरला त्यांनी जिल्हा बँकेतून कर्जही नाकारले. अशा परिस्थितीत स्वर्गीय श्रीपतराव शिंदे यांनी शेतकरी, कार्यकर्ते यांच्याकडून पैसे गोळा करून कारखाना सुरू केला. कारखाना सुरू होतोय म्हटल्यानंतर मुश्रीफांनी त्यांच्या संचालकांना राजीनामे देऊन कारखान्यावर प्रशासक आणला. आणि कारखाना बंद पाडण्याचे पाप त्यांनी केले.”

राजे समरजितसिंह घाटगे म्हणाले,”गेली पंचवीस वर्षे सत्तेत असणाऱ्या मुश्रीफांनी या भागातील तरुणांच्या हाताला रोजगार मिळावा म्हणून गडहिंग्लज एमआयडीसीत एक मोठा प्रकल्प आणता आला नाही. आयटी पार्क तसेच उद्योगधंदे आणण्याची खोटी आश्वासने त्यांनी दिली. या भागातील शिक्षण घेतलेल्या तरुणासाठी त्यांनी
एमपीएससी स्पर्धा परीक्षांसाठी एकही प्रशिक्षण केंद्र सुरू केले नाही. गडहिंग्लज एमआयडीसी मध्ये रस्ते वीज पाणी या सुविधा सत्ता मिळाल्यास उपलब्ध करून देऊ नवीन उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करू त्यामुळे येथील तरुणांना रोजगार उपलब्ध होऊन त्यांना पुणे मुंबईला जावे लागणार नाही.
स्वागत व प्रास्ताविक उपसरपंच संतोष पाटील यांनी केले.
यावेळी ॲड सुरेश कुराडे,ॲड दिग्विजय कुराडे,बाबासाहेब पाटील, अमरसिंह चव्हाण,अण्णासाहेब पाटील, दिलीप माने, प्रकाश कुंभार, श्रीपती कदम यांची भाषणे झाली. सभेस बाळासाहेब मोरे मामा, सुधाकर जगताप,रणजितसिंह पाटील,अनिल पाटील, संदीप पाटील अशोक चोथे,गणपती येसरे, दत्तात्रय जोशीलकर, सुरेश संकपाळ, तानाजी जोशीलकर , सुभाष पाटील, निंगोडा पाटील, राहुल कुरळे, सुभाष वाघे, संभाजी वाघे उपस्थित होते.
—–
चौकट-
*बंधारा पळवणारा लाडका नेता*

अत्याळ आणि लिंगनूर दरम्यान बंधारा होणार होता.पण तो कागदावरच राहिला. कारण कौलगे-कडगाव जिल्हा परिषदेच्या लाडक्या नेत्याने पालकमंत्री हसन मुश्रीफांच्या माध्यमातून पाटबंधारे विभागाला हाताशी धरुन स्वतःच्या फायद्यासाठी हा बंधारा एक किलोमीटर पुढे नेला. बंधाऱ्याची जागा बदलल्यामुळे लिंगनूर, अत्याळ गावातील शेकडो एकर जमीन मुबलक पाण्यापासून वंचित राहिली. धरणात पाणीसाठा मुबलक असून सुद्धा शेतकऱ्याला शेतीसाठी मुबलक पाणी मिळत नाही. मुश्रीफांनी या भागातील लाडक्या नेत्याच्या फायद्यासाठी शेकडो शेतकऱ्यांच्या चुलीत पाणी ओतण्याचे काम केले आहे. असे प्रतिपादन अमर चव्हाण यांनी केले.

फोटो ओळ: लिंगनुर क।। नूल : येथील महाविकास आघाडीचे उमेदवार समजीत सिंह घाडगे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत बोलताना सौ.स्वाती कोरी समोर उपस्थित जनसमुदाय.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!