*मुश्रीफ साहेब, लोकशाहीत एवढी मस्ती बरी नव्हे*
*दत्तोपंत वालावलकर*
*दुनिया दौलत से नही,ताकत से नही, मोहब्बत से चलती है.*
वालावलकर यांच्यासह 25 गावातील कार्यकर्त्यांचा समरजितसिंह घाटगे यांना पाठिंबा
कागल/प्रतिनिधी:
हसन मुश्रीफ म्हणतात की मला पाडणारा अजून जन्माला यायचा आहे. मुश्रीफ साहेब लोकशाहीत एवढी मस्ती बरी नाही. आमचा मुश्रीफांच्या प्रवृत्तीला विरोध आहे असे प्रतिपादन पंचायत समितीचे माजी सभापती श्री दत्तोपंत वालावलकर यांनी केले.
सेनापती कापशी येथील व परिसरातील वलयांकित नेतृत्व, पंचायत समितीचे माजी सभापती श्री दत्तोपंत वालावलकर यांच्यासह 25 गावातील कार्यकर्त्यांनी राजे समरजितसिंह घाटगे यांना या निवडणुकीत पाठिंबा दिला.
त्यावेळी ते बोलत होते
दत्तोपंत वालावलकर म्हणाले साके येथील एका कार्यक्रमात संजय घाटगे यांनी हसन मुश्रीफांना पाठिंबा देण्याचे जाहीर केले. त्यांच्या या निर्णयाबद्दल दुसऱ्या दिवशी त्यांना भेटून त्यांनी घेतलेल्या निर्णयास आमचा पाठिंबा नसल्याचे सांगितले.
दौलत से नही,ताकत से नही, मोहब्बत से दुनिया चलती है. याप्रमाणे 25 गावातील कार्यकर्त्यांना भेटून भूमिका सांगितली. मुश्रीफांसारख्या प्रवृत्तीसोबत जाण्याचे विचार पटले नाहीत. म्हणून आम्ही राजे समरजितसिंह घाटगे पाठिंबा दिला. असे सांगून ते म्हणाले,राजे समरर्जीतसिंह घाटगे, उच्चशिक्षित व पारदर्शक नेतृत्व असून त्यांच्या विजयासाठी
एकसंधपणाने लढूया.
राजे तुम्ही मुश्रीफांसारख्या महाशक्तीच्या विरोधात उभारायचे धाडस केले. याचे करावे तेवढे कौतुक थोडे आहे. लोकशाही जिवंत राहण्यासाठी. भयमुक्त समाजासाठी राजेसाहेब तुम्ही निवडून येणे गरजेचे आहे. विरोधी बाजूने पैशाचा पाऊस पडत आहे. मुश्रीफ चंद्र सूर्य सोडून सगळे देतील. मात्र स्वाभिमानी जनतेने लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी त्यांचा पराभव करणे आवश्यक आहे.
राजे समरजीतसिंह घाटगे म्हणाले, ” कागल गडहिंग्लज उत्तुरच्या परिवर्तनास दत्तोपंत वालावलकर यांच्यासह 25 गावातील कार्यकर्त्यांनी मला आशीर्वाद दिल्याबद्दल आभारी आहे. तुमचे आमचे राजकीय मतभेद झाले असतील पण आपण मनाने एक आहोत. मला तुम्ही पाठिंबा नव्हे तर आशीर्वाद दिला आहे. आपण एकमेकांशी विरोधात काम केले. पण मनभेद कधी झाले नाहीत. आमचा विरोध मुश्रीफांना नाही त्यांच्या विचारधारेला विरोध आहे. शरद पवार साहेबांचा विचार या मतदार संघात परत आणूया. हसन मुश्रीफ हे कधीच पुरोगामी नव्हती. त्यांनी पुरोगामीचा बुरखा पांगरला होता. कागल, गडहिंग्लज, उत्तुर मतदारच त्यांना पाडायला जन्माला आले आहेत.
स्वागत व प्रास्ताविक उमेश देसाई यांनी केले. यावेळी शाहू साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे शिवानंद माळी संभाजी भोकरे महेश मोरे महेश देशपांडे कृष्णात पाटील संजय शिंदे यांनी मनोगत व्यक्त आभार तुकाराम भारमल यांनी मारले.
—
चौकट-
*या कार्यकर्त्यांनी दिला पाठींबा..*
कागल पंचायत समितीचे माजी सभापती दत्तोपंत वालावलकर, महेश देशपांडे, मोहन मोरे, राजाराम बोळके, रामराव घोरपडे, बाबुराव भारमल, इस्माईल मुजावर, श्रीकांत लुगडे, भारत पाटील, सतीश गुरव खंडू चांडवले, एम.डी. चांडवले, सतीश गुरव, बाळासाहेब निचळ, अशोक पाटील, टी. एस. गडकरी, श्रीनिवास देशपांडे, आनंदा दिवटे, सचिन पडवळे, भीमराव ढोले, चंद्रकांत सांगले, मिलिंद देशपांडे, कृष्णात सव्वाशे, अभिजीत पोतदार, बाळासाहेब तेलवेकर, सागर माळी, पांडुरंग मोहिते, बाळासाहेब परीट, दत्तात्रय कुमठेकर यांनी पाठिंबा दिला.
—–