संभाव्य पुराच्या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या नागरीकांच्या सुरक्षेसाठी युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्या महापालिका प्रशासनाला सुचना
कोल्हापूर
गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले आहे. परिणामी पंचगंगा नदीचं पाणी इशारा पातळीवर आले आहे. अशावेळी नागरिकांच्या सुरक्षेसाठी युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी महापालिका अधिकार्यांसोबत शुक्रवार पेठ परिसराची पाहणी केली. तसेच प्रशासनाला काही सूचना देखील केल्या.
गेल्या ४ दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने, नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. पंचगंगा नदी इशारा पातळीवर गेल्याने, जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी आज सकाळी महापालिकेच्या अधिकार्यांना सोबत घेऊन, पुराचा फटका बसणार्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी पाहणी केली. शुक्रवार पेठेतील गायकवाड वाडा, जगद्गुरु शंकराचार्य मठ, गवत मंडई परिसरात सर्वप्रथम पुराचे पाणी शिरते. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे, अग्निशामक दलाचे प्रमुख मनिष रणभिसे यांच्यासह अग्नीशामक दलाचे कर्मचारी आणि कृष्णराज महाडिक यांनी गायकवाड वाडाजवळ राहणार्या कुटुंबीयांची भेट घेतली. पुराच्या काळात रोगराई वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे महापालिका यंत्रणेकडून धूर, औषध फवारणी करण्याबाबत त्यांनी सुचना केल्या. तसेच शंकराचार्य मठाच्या परिसरातील आणि गवत मंडईत परिसरातील नागरिकांचे स्थलांतरण करण्यासाठी उत्तरेश्वर पेठेतील शाळेची पाहणी केली आहे. या सर्व परिसराची स्वच्छता करून स्थलांतरीत नागरिकांना मुलभूत सुविधा मिळाव्यात, यासाठी महाडिक यांनी सूचना केल्या. तसेच कृष्णराज महाडिक यांचा मित्रपरिवार पूरबाधित नागरिकांच्या मदतीसाठी सदैव सज्ज असेल, असं सांगण्यात आलं. स्थलांतरीत नागरिकांना ब्लँकेटस्, कोरडा खाऊ यासह आवश्यक ती मदत मिळते की नाही, हे पाहण्याची जबाबदारी आपल्या मित्रमंडळींवर असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी जयदीप घरपणकर, राज माने, पृथ्वीराज मोरे, कुणाल भणगे, हरीश पाटील, सिद्धार्थ शिराळे, सुमित चौगुले, विशाल शिराळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.