खासदार धनंजय महाडिक यांनी केली शहरातील पूरग्रस्त भागाची पाहणी,

Spread the news

  • खासदार धनंजय महाडिक यांनी केली शहरातील पूरग्रस्त भागाची पाहणी
  • पूरग्रस्तांना आवश्यक सोयी-सुविधा आणि जनावरांसाठी चार्‍याची व्यवस्था करण्याची खासदार महाडिक यांची महापालिका प्रशासनाला सूचना
  • कोल्हापूर
  • कोल्हापूर शहराला पुराचा विळखा पडलाय. सखल भागाते पुराचे पाणी शिरले आहे. अशा परिस्थितीत खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर शहरातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. तसंच पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधून, त्यांना धीर दिला. पूरबाधितांसाठी सुरु केलेल्या निवारा केंद्रात, मुलभूत सोयी-सुविधा आणि जनावरांसाठी चार्‍याची व्यवस्था करण्याच्या सूचना, खासदार महाडिक यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या.
    खासदार धनंजय महाडिक यांनी आज सायंकाळी कोल्हापूर शहरातील पूरग्रस्त भागाला भेट दिली. नागरी वस्तीत पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण आहे. अशावेळी खासदार महाडिक यांनी कदमवाडी, सा़ळोखे पार्क परिसरातील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी सत्यजित कदम, कृष्णराज महाडिक, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, वैभव माने, रुपेश आडूरकर, राजू जानकर उपस्थित होते. त्यानंतर खासदार महाडिक यांनी बापट कॅम्प परिसरातील, संत गोरा कुंभार वसाहतीला भेट दिली. दरवर्षी पुराच्या पाण्यामुळं कुंभार व्यावसायिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळं इथल्या नागरिकांनी कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याची मागणी केली. त्याबाबत महानगरपालिका आणि शासनाकडं पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन खासदार महाडिक यांनी दिले. इथल्या नागरिकांची विचारपूस करुन, पूरबाधितांची गैरसोय होणार नाही, यासाठी योग्य ती दक्षता घेण्याची सूचना, खासदार महाडिक यांनी प्रशासनाला केली. यावेळी माजी नगरसेवक राजसिंह शेळके यांच्यासह भागातील नागरिक उपस्थित होते. व्हीनस कॉर्नर परिसरातही खासदार धनंजय महाडिक आणि कृष्णराज महािडक यांनी भेट देऊन नागरिकांशी संवाद साधत, दिलासा दिला. यावेळी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, शैलेश पाटील उपस्थित होते. त्यानंतर पंचगंगा हॉस्पिटलजवळील पुराचे पाणी शिरलेल्या भागाची खासदार महाडिक यांनी पाहणी केली. अजुनही पाणी वाढत असल्याने, लोकांनी सावधानता बाळगावी. स्थलांतरणासाठी तयारी ठेवावी, असे त्यांनी आवाहन केले. या भागातील लोकांसाठी तयार केलेल्या निवारा केंद्रांचीही त्यांनी माहिती घेतली. यावेळी सतिश घरपणकर, माजी नगरसेवक किरण शिराळे, विराज चिखलीकर, राजू माने, अनिकेत अतिग्रे, विशाल शिराळकर, किशोर घाटगे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतर दसरा चौकातील चित्रदुर्ग मठातील स्थलांतर लोकांची भेट घेवून खासदार महाडिक यांनी आस्थेने विचारपूस केली. इथल्या नागरिकांच्या अडचणी समजून घेवून त्या सोडवण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांनाही सूचना केल्या. तसेच कोल्हापूर पूरमुक्त व्हावे, यासाठी केंद्र शासनाच्या स्तरावरील विषयांचा पाठपुरावा करणार असल्याचं त्यांनी सांगितले.

Spread the news

You may also like

error: Content is protected !!