. बापूजी साळुंखे इंजीनिअरिंग इन्स्टिट्यूट आणि ‘स्वेरी’ यांच्यात सामंजस्य करार*

Spread the news

*डॉ. बापूजी साळुंखे इंजीनिअरिंग इन्स्टिट्यूट आणि ‘स्वेरी’ यांच्यात सामंजस्य करार*

कोल्हापूर : शिक्षण, तंत्रज्ञान, संशोधन आणि व्यवसाय क्षेत्रातील प्रगती आणि विकासाला चालना देण्यासाठी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी आणि श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट (स्वेरी)चे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर यांच्यात परस्पर सहकार्याचा सामंजस्य करार करण्यात आला. शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रांना पूरक इकॉसिस्टीम निर्माण करणे , संशोधन प्रक्रिया सुलभ करण्यासाठी फॅकल्टी अँड स्टुडन्ट एक्सचेंज प्रोग्रॅम, नवीन अभ्यासक्रमांच्या निर्मितीची निरंतर प्रक्रिया राबवणे या मुख्य उद्दिष्टांसाच्या पूर्ततेसाठी करार करण्यात आला.

डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट तर्फे संस्थेच्या सचिवा प्रा. शुभांगी गावडे आणि ‘स्वेरी’तर्फे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. कराराच्या माध्यमातून दोन्ही संस्थाच्या प्राविण्य क्षेत्रातील ज्ञान आणि कौशल्ये यांचे आदान प्रदान करणे,जॉईंट रिसर्च टीम बनवण्यासाठी एकमेकांना सहयोग करणे, प्लेसमेंटस् आणि औद्योगिक क्षेत्रातील संधींसाठी एकमेकांना सहाय्य करणे , विद्यार्थी आणि शिक्षक यांचा समावेश असणारे स्टार्टप्स किंवा टेक्नॉलॉजी व्हेंचर स्थापनेसाठी एकत्रित प्रयत्न करणे, निधी उभारणीसाठी एकत्रित प्रस्ताव देणे, दोन्ही संस्थांमधील सर्वोत्तम गुणवत्तेचा लाभ करून घेण्यासाठी नवीन मॉड्यूल्स विकसित करणे इत्यादी अनेक विषयांवर परस्परांना दृढ सहकार्य करण्यासाठी वचनबद्धता व्यक्त करण्यात आली.

याप्रसंगी बोलताना प्रा. गावडे यांनी ” परस्पर सहकार्यातून आधुनिक माध्यमांद्वारे विद्यार्थ्यांना परिपूर्ण शिक्षण देण्यासाठी हा करार महत्त्वपूर्ण ठरेल. या सहकार्याद्वारे आम्ही शिक्षण व व्यावसायिक क्षेत्र अधिक सक्षम बनवण्यासाठी प्रयत्नशील राहू ” असा विश्वास व्यक्त केला.

प्रा. बी.पी. रोंगे यांनी ” शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रात व्यापक हित साधण्यासाठी आज परस्पर सहकार्य करणे अनिवार्य असून हा करार विद्यार्थ्यांना ज्ञान व संधींनी समृद्ध करण्याच्या उद्दिष्टाला पूरक आहे” असे प्रतिपादन केले.

या करारामुळे विद्यार्थ्यांना औद्योगिक, शैक्षणिक एक्सपोजर मोठ्या प्रमाणात मिळणार आहे. महाराष्ट्रामध्ये दर्जेदार शिक्षणाचे एक क्लस्टर निर्माण होणार आहे. व्यावसायिक क्षेत्राला कुशल आणि प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. संशोधन क्षेत्राला मोठ्या प्रमाणावर निधी मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा व्यापक होण्यासाठी हा करार उपयुक्त असून विद्यार्थ्यांना आपले उज्वल भविष्य निर्माण करण्यासाठी नवीन संधी मिळणार आहेत.

याप्रसंगी यशस्वी खेळाडू आणि शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या व्यवसायिक शिक्षण समूहाचे संचालक प्राचार्य विरेन भिर्डी यांनी प्रास्ताविक केले. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांनी सामंजस्य कराराची मध्यवर्ती भूमिका स्पष्ट केली. ‘स्वेरी’चे विश्वस्त प्रा. सुरज रोंगे, डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉ. सुहास सपाटे, समन्वयक प्रा.शिशिर कुलकर्णी, विभागप्रमुख, विद्यार्थी, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी यांचेसह विविध मान्यवर उपस्थित होते. प्रा. सुदर्शन महाडिक, प्रा. अशोक कोळेकर यांनी सूत्रसंचालन केले. सामंजस्य करार यशस्वी होण्यासाठी दोन्ही संस्थांमधील वरिष्ठांनी भूमिका निभावली.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!