मनसे जिल्हाध्यक्षांवर दरोड्याचा गुन्हा, चौघांना अटक
कोल्हापूर
कार्यालयात घुसून बेदम मारहाण, दहशत, जातीवाचक शिवीगाळ आणि सीसीटीव्हीचा डीव्हीआर पळवून नेल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष आणि माजी नगरसेवक राजू दिंडोर्ले, प्रसाद पाटील, समर्थ कशाळकर आणि विकास कांबळे यांच्यासह चार आरोपींच्या विरुद्ध लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद झाला आहे. पोलिसांनी संशयितांना अटक केली असून त्यांना कोर्टापुढे हजर केले आहे .
याप्रकरणी श्री साई दर्शन जनता अर्बन को-ऑपरेटिव्ह संस्थेचा प्रमुख शुभम कृष्णा देशमुख (वय २५, रा.एकोंडी तालुका कागल) यांनी फिर्याद दिली आहे. लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी या गुन्ह्याची माहिती दिली. रंकाळा तलाव परिसरामध्ये श्री साई दर्शन जनता अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी नावाची संस्था आहे. या संस्थेमध्ये राजू दिंर्डोंले, प्रसाद पाटील, समर्थ कशाळकर, विकास कांबळे यांच्यासह तीन ते चार संशयिताने संस्थेच्या कार्यालयामध्ये केबिनमध्ये घुसून चेअरमन सचिन साबळे आणि उपचेअरमन सुरेश पाटील यांना अश्लील शिवीगाळ करून कमरेच्या पट्ट्याने व हातात येईल त्या वस्तूने बेदम मारहाण केली .ही घटना सोमवारी सकाळी साडेअकरा ते साडेपाच या वेळेमध्ये घडली. संशयितांनी फिर्यादी शुभम देशमुख याला जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच मारहाणीचा पुरावा नष्ट करण्यासाठी सीसीटीव्ही चा डीव्हीआर पळवून नेला.
फिर्यादी देशमुख यांच्याकडून जबरदस्तीने कागदावर पैसे घेतल्याचा मजकूर लिहून घेतला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती पण संशयित पळून गेले. शुभम देशमुख यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिल्यानंतर राजू दिंर्डोंले, प्रसाद पाटील, समर्थ कशाळकर आणि विकास कांबळे यांना अटक केली.
अटकेनंतर श्री साई दर्शन जनता अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या परिसरात मोठी गर्दी केली होती. दहा लाख रुपयाचे कर्ज देतो असे अमिष दाखवून साई दर्शन संस्थेतील संचालक, पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कर्ज मागणी करणाऱ्या लोकांकडून पाच हजारापासून ८५ हजार रुपये ठेवीच्या रूपाने पतसंस्थेत भरून घेतले होते. अनेक जणांना गेले कर्ज देतो असे म्हणून गेले वर्षभर झुलवत ठेवले आहे, असे गुंतवणूकदारांनी सांगितले. संस्थेत जमा केलेले पैसे परत मागणाऱ्या गुंतवणूकदारांना थातूरमातूर कारणे सांगून त्यांना टोलवाटोलवी केली जात होती. त्यानंतर काही गुंतवणूकदारांनी संशयितांकडे धाव घेतली. सं संशयितांनी साई दर्शनच्या चेअरमन उप चेअरमन आणि शुभम देशमुख यांच्याकडे गुंतवणूकदारांचे पैसे परत देण्याची मागणी केली. यावरून त्यांना मारहाण झाली अशी माहिती गुंतवणूकदारांनी सांगितली. पोलीस स्टेशन मध्ये गेला तर पैसे परत मिळणार नाही अशी धमकी साई दर्शनचे कर्मचारी देत हो