आमदार सतेज पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

Spread the news

आमदार सतेज पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव


लाखो वह्या संकलित, मान्यवरांची मोठी उपस्थिती

कोल्हापूर
विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते, पक्षाचे जिल्हाध्यक्ष, आमदार सतेज पाटील यांचा वाढदिवस शुक्रवारी मोठ्या उत्साहात पार पडला . त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राजकीय,सहकार,शैक्षणिक,कृषी, कला आणि क्रीडा अशा सर्वच क्षेत्रातील विविध मान्यवरांची मोठी गर्दी झाली होती . वह्या आणि पुष्पगुच्छांच्या स्वरूपात त्यांना भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या . दिवसभर आमदार सतेज पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला.

काँग्रेसचे नेते माजी गृहराज्यमंत्री, आमदार सतेज पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला .त्यांच्या वाढदिवसानिमित्त कसबा बावडा येथील त्यांच्या निवासस्थानासमोर यशवंत बंगल्यासमोर भव्य व्यासपीठासह मंडप उभारण्यात आला होता. या ठिकाणी आमदार सतेज पाटील यांच्यावर सकाळी सात वाजल्यापासून रात्रीपर्यंत राजकीय, सहकार ,शैक्षणिक, कृषी, कला आणि क्रीडा अशा सर्वच क्षेत्रातील नागरिकांनी शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

त्यांना वह्या आणि पुष्पगुच्छ यांच्या स्वरूपात सर्व समाज आणि घटकातील नागरिकांनी शुभेच्छा दिल्या . याठिकाणी येणाऱ्या नागरिकांसाठी उसाचा रस, कलिंगड आणि लस्सी अशा थंड पेय आणि पदार्थांची मोफत सोय करण्यात आली होती.

आमदार पी.एन. पाटील, आमदार जयश्रीताई जाधव, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, मधुरिमाराजे छत्रपती, माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख,काँग्रेसचे शहर प्रमुख सचिन चव्हाण, माजी महापौर सागर चव्हाण,गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगळे,संचालक अजित नरके, बयाजी शेळके, बाबासो चौगले, शशिकांत पाटील – चुयेकर, अंजनाताई रेडेकर, गोकुळचे माजी चेअरमन विश्वास पाटील, हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील – सरूडकर, विनय नलवडे, शशिकांत तिवले,अभिजित खतकर, भरत रसाळे, बबन पोवार, मोहन सालपे, यांच्यासह माजी नगरसेवक, विविध तरुण मंडळं तसचं विविध संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्र राज्यासह विविध राज्यातील राजकीय नेते मंडळी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनीही आमदार सतेज पाटील यांना मोबाईलद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या .

कौटुंबिक सोहळा
आमदार सतेज पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला . या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कसबा बावडा इथल्या राहत्या यशवंत बंगल्यात आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते केक कापण्यात आला . आईसाहेब सौ . शांतादेवी पाटील, डॉक्टर डी .वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर संजय पाटील, सौ . वैजयंती पाटील, आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील, यांच्यासह संपूर्ण डॉक्टर डी . वाय . पाटील कुटुंबियांनी आमदार सतेज पाटील यांना केक भरऊन, त्यांना वाढदिवसाच्या सहृदयपूर्वक शुभेच्छा दिल्या .


Spread the news

You may also like

error: Content is protected !!