आमदार प्रकाश आवाडे यांना घाम नाही तर त्यांच्या पायाखालची वाळू घसरली मदन कारंडे यांचा टोला

Spread the news

 

आमदार प्रकाश आवाडे यांना घाम नाही तर त्यांच्या पायाखालची वाळू घसरली

मदन कारंडे यांचा टोला

इचलकरंजी : महाविकास आघाडी कडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आमदार प्रकाश आवाडे यांना घाम नाही तर त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. त्यामुळे त्यांना मदन कारंडे या नावाचा डमी उमेदवार इचलकरंजी विधानसभा मतदार संघात उमेदवार म्हणून आणावा लागला , अशी टीका मदन कारंडे यांनी आमदार आवडे यांच्या केली.
वेताळ पेठ मंदिरात जाऊन नारळ वाढवून कॉर्नर सभेमध्ये कारंडे हे बोलत होते. यावेळी परिसरातील नागरिकांनी काढलेला बुके, हार व शाल देऊन पाठींबा दिला. ते पुढे म्हणाले, वरील राजकीय वारसा नसतानाही मी व्हिजन ठेवून नगरसेवक म्हणून निवडून आलो आणि त्या ठिकाणी ठेवलेले व्हिजन पूर्ण करून दाखवले. आमदारकी मी कुटुंबासाठी मागणार नाही, वारसा वरून नाही तर कर्तुत्वावर मागायला आलोय त्यासाठी एकदा आमदार म्हणून निवडून द्या, अशीच सादही कारंडे यांनी उपस्थिततांकडे घातली.
ते पुढे म्हणाले, लोकसभेला महायुतीला जनतेने नाकारल्याने त्यांना लाडकी बहीण योजना आठवली. ते सध्या दीड हजार रुपये लाडक्या बहिणीला देत असून आमचे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यास अडीच हजार रुपये देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही कारंडे यांनी नमूद केले. मँचेस्टर आघाडीचे सागर चाळके , प्रकाश मोरबाळे, सयाजी चव्हाण, स्थानिक मान्यवर, कार्यकर्ते व विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!