महाराष्ट्राला गवसणी घालण्याची ताकत आमदार प्रकाश आबीटकर यांच्या मध्ये आहे – खासदार धैर्यशील माने
राशिवडे येथे विराट प्रचार सभा,सर्व समाज आबीटकरांच्या विजयासाठी एकवटले
राशिवडे
राधानगरी मतदारसंघाचा विकास व्हावा या एकाच ध्येयापोटी आमदार प्रकाश आबीटकर यांनी भगवा पताका खांद्यावर घेतली असुन त्यांनी आपल्या साठी कधी ही काहीही मागितले जे काही मागितले ते केवळ या मतदारसंघाच्या विकासासाठी मागितले त्यांचे एवढे कर्तृत्व आहे की महाराष्ट्राला गवसणी घालण्याची ताकत त्यांच्या मध्ये आहे असे प्रतिपादन खासदार धैर्यशील माने यांनी केले. राशिवडे ता.राधानगरी येथील प्रचारसभेत ते बोलत होते, एकनाथ चौगले अध्यक्षस्थानी होते.
भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, सह्याद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब नवणे, राधानगरी तालुका संघाचे अध्यक्ष विठ्ठलराव खोराटे, गोकुळ चे चेअरमन अरुणकुमार डोंगळे, आर.पी.आय चे प्रदेशाध्यक्ष शहाजी कांबळे,जालिंदर पाटील प्रमुख उपस्थित होते.सभेच्या निमित्ताने सर्व समाज आबीटकरांच्या विजयासाठी एकवटले चित्र ठळकपणे जाणवले.
खासदार धैर्यशील माने म्हणाले की, जनतेच्या जीवावर निवडणूक लढवणारा एकमेव आमदार असुन आबीटकर म्हणजे गोरगरिबांचे नेतृत्व आहे, प्रत्येक माणसाला आपलं वाटणारे व्यक्तीमत्व आहे. महाराष्ट्रात असा एकही विभाग नाही जेथे आबिटकर यांचा दरारा नाही प्रत्येक विभागाची खडा आणि खडा माहिती त्यांना असल्यामुळे कोणताही अधिकारी त्यांचे काम नाकारू शकत नाही न भूतो न भविष्यतो असा निधी त्यांनी या मतदारसंघात आणलेला असून जनतेनेही मागील अनेक वर्षातील आपल्या गावातील निधीचा व आमदार आबीटकर यांनी आणलेल्या निधीचा विचार करावा, मूल्यांकन करावे आणि मगच मतदान करावे. संपूर्ण मतदारसंघ हाच आपला कुटुंब मानणारा हा लोकप्रतिनिधी असून कधीही पाहिली नव्हती एवढी विकास गंगा त्यांच्या माध्यमातून या मतदारसंघात आलेली आहे. पाय मारेल तिथे पाणी काढणारा हा आमदार असून विकासाचे गंगेचे सातत्य ठेवण्यासाठी जनतेने त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे. शेतकऱ्यांची मजुरांची गोरगरीबांचे व सामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने ते प्रयत्नशील असतात .आज पर्यंतच्या इतिहासात महाराष्ट्राला सक्षम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रूपाने लाभला असून त्यांचे दरवाजे पहाटे चार पर्यंत लोकांच्या करता उघडे असतात सामान्य माणसाच्या पायाशी निष्ठा असणारा हा आमदार इतिहास घडवेल त्यांचे नाणे खणखणीत असून त्यांना आणि विरोधी उमेदवारांना समोरासमोर बसवल्यास परमेश्वर सुद्धा सांगेल की प्रकाश आबीटकर योग्य उमेदवार आहेत.
आमदार प्रकाश आबीटकर म्हणाले की,वाड्या वस्त्या वर विकास नेला असुन चांगल्या पद्धतीचे काम या परिसरात झाली आहेत . दहा वर्षांपूर्वी ची बाजार पेठ आठवा काय अवस्था होती आणि आताची बाजार पेठेचे रूप पहा. राशिवडेतील विकास पाहुन जनता सुखावली आहे. गेल्या दहा ज्यांनी मतदार संघाकडे पाठ फिरवली ते आता मते मागण्यासाठी फिरत आहेत पण जनता त्यांना प्रतिसाद देणार नाही हे, त्यांना मते मागण्याचा अधिकार नाही.
आर पी आय चे प्रदेशाध्यक्ष प्रा. शहाजी कांबळे म्हणाले,राशिवडेतील प्रचंड गर्दी विजय निश्चित करणारी आहे .कर्तबगार आमदार प्रकाश आबीटकर असुन कायापालट करणारे आहेत. राशीवडेचीची माती क्रांती घडविणारी असुन विरोधकांना चितपट करणार आहे. विकासाची गंगा घराघरात पोहचणार आहे.विधानसभेत पहिल्या माळे पासुन सातव्या माळे पर्यंत धावणार हा सामान्य आमदाराला मंत्री म्हणून बसवायाची जनतेची इच्छा आहे.
भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील म्हणाले की,कुठलाही गट तट पक्ष न मानता आबीटकर यांनी मतदारसंघात कामे केल्यामुळे जनता त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून प्रकाशराव यामुळे विकासाचे नवे पर्व सुरू झाले आहे
प्रा जालिंदर पाटील म्हणाले राशिवडे मध्ये प्रत्येक समाजाला न्याय देण्याचे काम आंबेडकर यांनी केले असून प्रचंड निधीमुळे राशीवड्याची रूपडे पालटलेआहे.
गोकुळ चे चेअरमन अरुणकुमार डोंगळे म्हणाले की,के पी पाटील दहा वर्षांत मतदार संघात काय विकास केला यांचे आत्मचिंतन करावे तुम्हाला संधी मिळाली पण तिचे सोने करता आली नाही के पी चे पुस्तक कोरे आहे.आबीटकरांनी मतदार संघात प्रचंड काम केले आहे.त्यांना एवढे मताधिक्य द्या .
यावेळी जनता दलाचे जेष्ठ नेते विठ्ठलराव खोराटे,रविश पाटील -कौलकर, संभाजीराव आरडे, विजय महाडिक, शेखर पाटील, धीरज कळस्कर,शाकीर पाटील,पवन महाडीक, दिलीप पाटील, रावसाहेब डोंगळे, अजित पाटील, प्रल्हाद पाटील, सरपंच संजीवनी पाटील, हरीश मगदूम, सुनिल तवटे, राम चौगले, मुराद मुल्ला, मच्छिंद्र लाड, आनंदा चौगले, अशोक पाटील, मंदाकिनी पाटील, साधना पाटील यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
चौकट….
कोट्यावधींचा निधी
राशिवडे गावास तब्बल आमदार प्रकाश आबीटकर यांनी साडे तेवीस कोटी निधी उपलब्ध करून दिलेला असुन राशिवडेच्या आजच्या सभेला अभुतपुर्व गर्दी झाली होती.
राशिवडेची रास……
राशिवडे करांचा अलोट उत्साह सर्वाना ऊर्जा देणारा होता त्याचा संदर्भ घेत खासदार धैर्यशील माने म्हणाले की,राशिवडेची रास भरभरून ओसंडुन वाहून हे गाव हातात धनुष्य बाण च घेईल याची प्रचिती देईल.