जिल्ह्यातील सर्व पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर चालवण्यासाठी आराखडा तयार करा- आमदार अमल महाडिक यांचे बैठकीत निर्देश*

Spread the news

*जल जीवन मिशन अंतर्गत स्वच्छ आणि मुबलक पाणीपुरवठ्याचे नियोजन करा तसेच जिल्ह्यातील सर्व पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर चालवण्यासाठी आराखडा तयार करा-

आमदार अमल महाडिक यांचे बैठकीत निर्देश*

कोल्हापूर

दक्षिण विधानसभा मतदारसंघातील 22 गावांमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजना राबवण्यात येत आहे. यातील चार गावांची योजना पूर्णत्वाला गेली असून उर्वरित अठरा गावांसाठी योजनेचे काम प्रगतीपथावर आहे. या अनुषंगाने आमदार अमल महाडिक यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांच्यासमवेत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

या बैठकीला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जल जीवन मिशन, एमआयडीसी, महावितरण तसेच जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार महाडिक यांनी पूर्णत्वाला गेलेल्या योजना लवकरात लवकर कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या. तसेच प्रगतीपथावर असलेल्या योजनांची चार भागांमध्ये विभागणी करून वितरण प्रणाली, जलशुद्धीकरण प्रकल्प, पाणी टाक्या अशा टप्प्यांमध्ये आराखडा सादर करण्याच्या सूचना दिल्या. काही योजनांच्या सुधारित आराखड्याला मंजुरी देण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली. शासन स्तरावर या मंजुरीसाठी प्रयत्न करण्याची ग्वाही आमदार महाडिक यांनी दिली.

पुढील 30 वर्षांचा कार्यकाळ लक्षात घेऊन वाढत्या लोकसंख्येला स्वच्छ आणि मुबलत पाणीपुरवठा होईल यासाठी नियोजन करावे. एमआयडीसी कडून पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या गावांना वाढीव पाणी पुरवठ्यासाठी आवश्यक असल्यास प्रस्ताव सादर करावा असे निर्देश महाडिक यांनी दिले. ज्या गावांमध्ये पाणी टाकी अथवा जलशुद्धीकरण केंद्राच्या जागे संदर्भात अडचणी आहेत त्या गावातील ग्रामसेवक आणि सरपंचांची बैठक घेऊन या अडचणीचे निराकरण करण्यात येईल तसेच ज्या गावांची महावितरण कडे थकबाकी आहे त्या गावातील ग्रामसेवकांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निर्देश देण्याची सूचना महाडिक यांनी केली.
ग्रामस्थांना नळ जोडणी साठी कमीत कमी शुल्क आकारावे तसेच कणेरी येथे उभारण्यात येणाऱ्या जल शुद्धीकरण केंद्राचीही माहिती आमदार महाडिक यांनी घेतली.
त्याचबरोबर राज्यातील सर्व पाणीपुरवठा योजना सौरऊर्जेवर कार्यान्वित कराव्यात जेणेकरून वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे होणाऱ्या पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार नाही सूचनाही अमल महाडिक यांनी केल्या.
याबाबत सखोल अभ्यास करून आराखडा बनवावा शासन स्तरावर निधीसाठी पाठपुरावा केला जाईल अशी ग्वाही आमदार महाडिक यांनी दिली.
प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर काही पाणीपुरवठा योजनांचे लोकार्पण करण्याचा मानसही आमदार महाडिक यांनी व्यक्त केला.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!