काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत उत्तर-दक्षिणच्या प्रचाराचे सूक्ष्म नियोजन
कोल्हापूर : महाविकास आघाडीचे कोल्हापूर उत्तरमधील उमेदवार राजेश लाटकर व कोल्हापूर दक्षिण मधील उमेदवार विद्यमान आमदार
ऋतुराज पाटील यांची उमेदवारी घरोघरी पोहचविण्यात कार्यकर्ते कुठेही कमी पडणार नाहीत. मतदारांशी वैयक्तिक गाठीभेटी, कॉर्नर सभा,
आमदारकीच्या माध्यमातून विविध योजनांचा लोकांना मिळवून दिलेला लाभ पोहोचविणे यावर भर देण्याचे ठरले.
कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी येथे रविवारी सकाळी कार्यकर्त्यांची बैठक झाली. काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, शिवसेनेचे शहरप्रमुख
सुनील मोदी, काँग्रेसचे पदाधिकारी बाळासाहेब सरनाईक, काँग्रेसच्या महिला आघाडीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या सरला पाटील, माजी महापौर
सूरमंजिरी लाटकर आदींच्या उपस्थितीमध्ये ही बैठक झाली. या बैठकीला कोल्हापूर उत्तर आणि दक्षिणमधील कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
या बैठकीत कार्यकर्त्यांनी प्रचाराच्या सूक्ष्म नियोजनासंबंधी विविध सूचना केल्या. जास्तीत जास्त मतदारापर्यंत उमेदवारी पोहोचविण्याचे ठरले.
काँग्रेसच्या महिला पदाधिकारी संध्या घोटणे, चंदा बेलेकर, वैशाली महाडिक, शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक दत्ता टिपुगडे, मंजित
माने, राष्ट्रवादीचे जयकुमार शिंदे आदी उपस्थित होते. दरम्यान काँग्रेसच्या महिला आघाडीच्यावतीने लाडकी बहिण योजनेवरुन महिलाविषयी
अवमानकारक वक्तव्य केले म्हणून खासदार धनंजय महाडिक यांचा निषेध करण्यात आला.
…………………………