कोल्हापूर. खासदार श्री शाहू छत्रपती महाराज यांनी काळमवाडी ता. राधानगरी येथील दूधगंगा धरणाची पाहणी केली. धरणाला लागलेल्या गळतीची पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. धरणाच्या दुरुस्तीचे काम लवकरात लवकर चालू करण्याच्या सूचना महाराजांनी केल्या. तसेच वाया जात असलेल्या पाण्याचे योग्य उपायोजन करण्याच्या सूचना संबंधित अधकाऱ्यांना केल्या.
यावेळी माजी आमदार के. पी. पाटील, अधीक्षक अभियंता अभिजीत म्हेत्रे, उपअभियंता पी पी पारकर, कार्यकारी अभियंता अशोक पोवार, पी. डी. धुंदरे, आर. के. मोरे, हिंदुराव चौगुले, अभिजीत तायशेटे, संदीप डवर, दत्तात्रय साळोखे, सुधाकर साळोखे, संजय माळकर, रमेश बाचाटे, संदीप पाटील, चंद्रकांत चौगुले तसेच भागातील नागरिक उपस्थित होते.