*उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा यशस्वी करण्याचा निर्धार…..*
राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक *शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवा पालकमंत्री मुश्रीफ…..*
कोल्हापूर*
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार रविवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा यशस्वी करण्याचा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत करण्यात आला.अध्यक्षांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ होते. त्यांनी उपमुख्यमंत्री पवार यांचे तीन कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाला जास्तीत जास्त कार्यकर्ते आणण्यासाठी काटेकोरपणे नियोजन करावे असे आवाहन केले……*
अजित पवार रविवारी कोल्हापूर दौऱ्यावर येत असून या दिवशी त्यांचे विविध कार्यक्रम जिल्ह्यात आयोजित करण्यात आले आहेत दुपारी कोल्हापूर महासैनिक दरबार येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा आणि सायंकाळी कागल येथे जाहीर सभा असे कार्यक्रम होणार आहेत त्यांच्या दौऱ्याच्या नियोजनासाठी रविवारी मार्केट यार्ड येथील पक्षाच्या जिल्हा कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती.
राजकारणापेक्षा समाजकारणाला राष्ट्रवादी काँग्रेसने महत्व दिले आहे. राजकारणात टिकून यशस्वी होण्यासाठी सर्वसामान्य कार्यकर्त्याला खूप परिश्रम घ्यावे लागतात त्यामुळे सर्व सर्वसामान्यांची कामे करण्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे आणि त्यांना नक्कीच हात देण्याचे काम करावे.शासनाच्या विविध योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवाव्यात असेही मुश्रीफ यांनी सांगितले…..
स्वागत व प्रास्ताविक जिल्ह्याचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील अआसुर्लेकर यांनी केले कोल्हापुरातील मेळाव्यास पाच ते सहा हजार कार्यकर्ते उपस्थित राहतील असे त्यांनी सांगितले….. यावेळी महिला जिल्हाध्यक्ष शितल फराकटे, शहराध्यक्ष आदिल फरास,गोकुळ संचालक प्रा किसन चौगुले,शहराध्यक्ष विठ्ठल चोपडे, संभाजी पवार यांनी मते मांडली…….
यावेळी *आमदार राजेश पाटील गोकुळचे संचालक युवराज पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे, शेतकरी संघाचे अध्यक्ष प्रवीणसिंह पाटील, केडीसीसी बँकेचे संचालक भैया माने, रणवीरसिंह गायकवाड, संतोष पाटील,युवक जिल्हाध्यक्ष नितीन दिंडे, महिला शहराध्यक्ष रेखाताई आवळे, महेंद्र चव्हाण,जयसिंग चव्हाण, यासीन मुजावर, संतोष धुमाळ,आप्पासाहेब धनवडे, मधुकर जांभळे, शिवाजी देसाई संभाजी पाटील-पाटील-भुयेकर, शिरीष देसाई, डॉ हरिश्चंद्र पाटील,भिकाजी एकल,अमित गाताडे यांच्यासह मान्यवर नेतेगण व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते……