मालोजीराजे – मधुरिमाराजे होणार लाटकरांच्या प्रचारात
- मालोजीराजे यांची घोषणा
कोल्हापूर : माजी आमदार मालोजीराजे आणि मधुरिमाराजे छत्रपती हे महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांच्या प्रचारात सक्रिय होणार आहेत. मालोजी राजे यांनी बोलावलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात हा निर्णय घेतला. याप्रसंगी काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणी मधुरिमा राजे छत्रपती यांनी निवडणुकीतून माघार घेतली होती. त्यांच्या अचानक माघारीच्या निर्णयाने खळबळ उडाली होती. मधुरिमा राजे छत्रपती यांनी माघार घेतल्यामुळे महाविकास आघाडीने राजेश लाटकर यांची उमेदवारी पुरस्कृत केली आहे. कोल्हापूर उत्तर च्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये बऱ्याच घडामोडी घडल्या.
रविवारी मालोजीराजे छत्रपती आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. खासदार छत्रपती शाहू महाराज यांना पहिल्यापासून सामान्य घरातल्या कार्यकर्त्याला संधी मिळाली मात्र कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना असल्याने आम्ही काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज भरला होता अनेक घडामोडीनंतर उमेदवारी अर्ज मागे घेऊन सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे राहून लाटकर यांना आमदार करण्याची भावना श्रीमंत खासदार शाहू महाराज यांनी व्यक्त केली यांच्या आदेशानुसार माजी आमदार छत्रपती मालोजीराजे गट व काँग्रेसचे कार्यकर्ते जिल्ह्यातील दहाही विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजय करण्यासाठी पासून सक्रिय होतील. तसेच कोल्हापूर उत्तर मतदारसंघात लाटकर यांना निवडून आणण्यासाठी सर्व कार्यकर्ते ताकतीने प्रचारात उतरतील असा विश्वास यावेळी माजी आमदार छत्रपती मालोजीराजे यांनी व्यक्त केला. यावेळी मधुरिमाराजे छत्रपती उपस्थित होत्या