कलागुणांना वाव देण्याचा माळी समाजाचा निर्णय कौतुकास्पद
आमदार ऋतुराज पाटील यांचे गौरवोद्गार
कोल्हापूर
‘घरगुती गणेश सजावट, झिम्मा फुगडी यासह विविध स्पर्धा आणि उपक्रमाच्या माध्यमातून समाजातील बंधू आणि भगिनींच्या कलागुणांना वाव देण्याचा लिंगायत माळी समाज कोल्हापूर जिल्हा संघटनेचा उपक्रम कौतुकास्पद आहे’ असे गौरवोद्गार आमदार ऋतुराज पाटील यांनी काढले.
लिंगायत माळी समाज कोल्हापूर जिल्हा व जिल्हा माळी समाज महिला मंडळ यांच्या वतीने आयोजित केलेल्या विविध स्पर्धेच्या बक्षीस समारंभ प्रसंगी आमदार पाटील बोलत होते. अक्क महादेवी मंडप येथे झालेल्या झिम्मा फुगडी स्पर्धेला समाजातील भगिनींनी उदंड प्रतिसाद दिला. शिवाय गणेशोत्सव घरगुती सजावट स्पर्धेलाही मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला.
प्रारंभी महिला संघटनेच्या अध्यक्षा साधना माळी यांनी स्वागत केले. समाजाचे अध्यक्ष
गुरुबाळ माळी यांनी प्रास्ताविक करताना समाजाच्या उपक्रमांची माहिती दिली. झिम्मा फुगडी स्पर्धेत तळंदगे येथील जिजामाता ग्रुपने पहिला, पोहाळे येथील रणरागिणी ग्रुपने दुसरा तर कांडगाव येथील स्वामी समर्थ ग्रुपने तिसरा क्रमांक पटकावला. गणेशोत्सव देखावा स्पर्धेत कसबा बावडा येथील किरण माळी प्रथम, बस्तवडे येथील पियुष माळी द्वितीय तर कोल्हापुरातील अतुल माळी यांनी तिसरा क्रमांक मिळवला. यावेळी झालेल्या लकी ड्रॉ स्पर्धेतील विजेत्यांना आमदार पाटील यांच्या हस्ते बक्षीसे देण्यात आली.
दरम्यान, 13 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या समाज मेळावा वधू-वर मेळाव्याच्या तयारी संदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली. विजेत्यांना विविध मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आली.
यावेळी समाजाचे उपाध्यक्ष अनिल माळी, कार्याध्यक्ष संतोष माळी, सचिव राजू यादव, खजानिस किशोर माळी, तानाजी माळी, राजाराम माळी, अशोक माळी, बाळासाहेब माळी, महिला संघटनेच्या उपाध्यक्ष वंदना माळी, कार्याध्यक्ष मीनाक्षीताई माळी, तसेच सिताराम बापू चौगुले, पांडुरंग माळी, गणपतराव बेळकुड, विजय माळी, एम.बी. माळी, सदाशिव बुबने, प्रभाकर कुलगुडे, शरद माळी, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन संतोष माळी यांनी केले आभार अनिल माळी व अर्चना माळी यांनी मानले.