कोल्हापूर : माजी खासदार रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष वस्वराज्य पक्षाचे प्रमुख माजी खासदार संभाजीराजे यांचा वाढदिवस कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात केला . संभाजीराजे परदेशात असल्याने त्यांच्याशी उपस्थितांनी ऑनलाईन संवाद साधून शुभेच्छा दिल्या.
अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती, छत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्ट, संभाजीराजे फाऊंडेशन, सह्याद्री प्रतिष्ठछन, शिव-शाहूमंच, स्वराज्य पक्ष यासह विविध संस्था-संघटनांच्या वतीने जुना राजवाडा-भवानी मंडप येथील तुळजाभवानी मंदिरात केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यानंतर विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी संभाजीराजे यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी फत्तेसिंह सावंत, विनायक फाळके, माणिक मंडलिक, संजय पवार, राहुल शिंदे, नंदकुमार बामणे, शाहीर शहाजी माळी, अमर पाटील, सोमनाथ लांबोरे, पुरुषोत्तम गुरव, अभिजित पाटील, जनार्दन यादव, संदीप शेवाळे, उदय घोरपडे, प्रसन्न मोहिते, अंकुश कदम, विनोद साबळे, महादेव देवस्कर, राजू खोत, सुहास पाटील, भूषण सोनटक्के, संदीप चौगुले, विकास देवाळे, अजय पाटील, धनंजय पाटील, योगेश शिंदे, संतोष पोवार, अमितकुमार भोसले, उदय बोंद्रे, वसिम मोमीन, बाळासाहेब दादर्णे, पवन निपाणीकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.