कोल्हापूर : दिवंगत माजी आरोग्य मंत्री दिग्विजय खानविलकर यांच्या ७३व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केले. करवीरसह जिल्ह्यातील त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावत लाडक्या नेत्याला अभिवादन केले.
काही दिवसापूर्वी नागाळा पार्क येथील चौकास खानविलकर यांचे नाव देण्यात आले. आरोग्य मंत्री म्हणून काम करत असताना त्यांनी केवळ कोल्हापूरच नव्हे तर संपूर्ण राज्याला आदर्श वाटेल असे काम केले होते. कोल्हापुरात सरकारी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करताना कोल्हापूरची ओळखच बदलण्याचे काम त्यांनी केले. सीपीआर रुग्णालयाचा चेहरा मोहरा त्यांनी बदलला. सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी नाळ असलेला नेता म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली होती. त्यांच्या 73 व्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन जिल्हा बँकेच्या माजी संचालिका राजलक्ष्मी खानविलकर यांच्या हस्ते करण्यात आले.
दिवंगत नेते दिग्विजय खानविलकर हे जरी आपल्यासोबत नसले तरी त्यांनी उभं केलेले काम आजही दीपस्तंभासारखे उभे आहे. त्यांच्या विचाराचा वारसा यापुढे नेटाने चालू ठेवत असताना तालुक्यातील सामान्य माणसाला आधार देण्याची भूमिका आपणाला घ्यावी लागेल, असे आवाहन राजलक्ष्मी खानविलकर यांनी केले.
विश्वविजय खानविलकर, सुमित्रादेवी खानविलकर, सिद्धविजय खानविलकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे, ‘कुंभी कासारी’चे संचालक संजय पाटील, गडमुडशिंगीचे माजी उपसरपंच सर्जेराव पाटील, चंद्रकांत पाटील (केर्ले), संभाजी पाटील (भुयेवाडी), अमित सामंत (कुडाळ), आप्पासाहेब धनवडे (गडमुडशिंगी), विजय यादव, इंद्रराज देसाई, बाजीराव कांबळे, सुरेश पाटील (निगवे दुमाला), किरण घाटगे (चिंचवडे), बंटी सावंत, अनिल घाटगे, आदी उपस्थित होते.