माई-ह्युंदाई ठरली भारतातील सर्वोत्कृष्ट ह्युंदाई डिलरशीप !
बाकू (अझरबैजान) येथे ह्युंदाई मोटर्स लि.च्या वतीने आयोजित नॅशनल डीलर्स कॉन्फरन्स मध्ये माई ह्युंदाई ग्रुपला प्रतिष्ठित “चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भारतातील एकूण 600 डीलरशिप्समधून माई ह्युंदाईने हा गौरव मिळवला आहे. माई ह्युंदाईचे मॅनेजिंग डायरेक्टर तेज घाटगे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी डायरेक्टर दिग्विजय राजेभोसले, जनरल मॅनेजर विशाल वडेर आणि जनरल मॅनेजर सतीश पाटील उपस्थित होते.
ह्युंदाई डीलरशिप चॅम्पियनशिप हा पुरस्कार उत्कृष्ट विक्री आणि ग्राहक सेवेमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या डीलरशिप्सना दिला जातो. माई ह्युंदाई ही ह्युंदाई मोटर्सच्या पश्चिम आणि कोकण विभागातील अग्रगण्य डीलरशिप म्हणून ओळखली जाते. गेली २८ वर्षे कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये कोल्हापूर, उचगांव, टिंबर मार्केट,कोल्हापूर,कबनूर, जयसिंगपूर, रत्नागिरी, कुडाळ, चिपळूण, कणकवली, तासगांव, इस्लामपूर, सांगली आणि कवठेमहांकाळ अशा १३ शाखांमधून 50,000 हून अधिक ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देण्याचा माई ह्युंदाईचा समृद्ध अनुभव आहे. ग्राहक सेवेतील उत्कृष्टतेसाठी माई ह्युंदाईला यापूर्वीही अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
“नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मिळालेला हा पुरस्कार आमच्यासाठी प्रेरणादायी आणि आत्मविश्वास वाढवणारा आहे. या यशाचे श्रेय आमच्या ग्राहक, कर्मचारी, आणि व्हेंडर्स यांना जातं. त्यांचे मनःपूर्वक आभार,” असे प्रतिपादन मॅनेजिंग डायरेक्टर तेज घाटगे यांनी केले.