महिलांच्या जागतिक इतिहासात ताराराणींचा उल्लेख करावाच लागेल सुप्रिया सुळे यांचे गौरवोद्गार, पन्हाळ्यावर उभारणार ताराराणींचा पुतळा

Spread the news

 

 

 

 

महिलांच्या जागतिक इतिहासात ताराराणींचा उल्लेख करावाच लागेल

सुप्रिया सुळे यांचे गौरवोद्गार, पन्हाळ्यावर उभारणार ताराराणींचा पुतळा

 

म. टा. प्रतिनिधी,  कोल्हापूर

जगात जेव्हा जेव्हा महिलांच्या पराक्रमाचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा तेव्हा बलाढ्य औरंगजेबाशी सात वर्षे झुंज देणाऱ्या, दडपशाहीला बळी न पडता स्वराज्याची राखण करणाऱ्या महाराणी ताराराणीचा उल्लेख करावाच लागेल असे गौरवोद्गार खासदार सुप्रिया सुळे यांनी काढले. दरम्यान, ताराराणी स्थापन केलेल्या राज्याच्या राजधानीच्या ठिकाणी म्हणजे पन्हाळा गडावर त्यांचा व छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्याची घोषणा यावेळी करण्यात आली.

छत्रपती शहाजी म्युझियम ट्रस्ट व महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोगलमर्दिनी महाराणी ताराराणी या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन खासदार सुळे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या. ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी लिहिलेल्या या प्रकाशन समारंभाच्या अध्यक्षस्थानी खासदार शाहू महाराज होते. यावेळी कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक व धैर्यशील माने, माजी खासदार संभाजीराजे, माजी आमदार मालोजीराजे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.  दरम्यान, इतिहास सोयीचा नको सत्य हवा असे सांगत ताराराणींचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी टी.व्ही. मालिका अथवा चित्रपट काढण्याबरोबरच शालेय पुस्तकांत त्यांच्या जीवनचरित्राचा समावेश करावा अशी मागणी सुळे यांनी केली.

खासदार सुळे म्हणाल्या, सर्वच युध्दे तलवारीने झिंकता येत नाहीत. काही ठिकाणी हुशारी महत्त्वाची असते. त्याचा वापर केल्यास जिंकणे अवघड नसते. ताराराणींनी सात वर्षे औरंगजेबाला झेरीस आणलेच. त्यानंतर पन्नास वर्षे त्यांनी जो स्वाभिमान राखला, त्याचाही इतिहास डॉ. पवार यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून समोर आणला आहे. हे पुस्तक इंग्रजी भाषेतही व्हावं, म्ह्णजे जगात त्यांचा इतिहास पोहोचेल.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, पन्हाळा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा उभारावा यासाठी तीन कोटी रूपये दिले आहेत. आता, महाराणी ताराराणी यांचाही पुतळा तेथे उभारण्यात येईल.

पालकमंत्री आबिटकर म्हणाले,  ताराराणी यांचे जीवन चरित्र हे प्रेरणादायी आहे. ते पुस्तक रूपाने लोकांसमोर येत आहे, ही बाब अभिमानास्पद आहे.

खासदार शाहू महाराज म्ह्णाले,  महाराणी ताराराणी यांनी आपल्या कतृत्वाचा डंका देशाच्या अनेक कानाकोपऱ्यात वाजवला. विकासाचा नवा मॉडेल हा महाराष्ट्रच उभा करू शकतो. हाच महाराष्ट्र पॅटर्न सर्वत्र राबविण्याची गरज आहे.

प्रा. जयसिंगराव पवार म्हणाले,  ज्यांची नोंद जगाच्या इतिहासात ‘दुसरा पर्याय’ नाही अशी झाली, त्या ताराराणींचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यात आम्ही कमी पडलो. त्यांनी पेशव्यांना विरोध केला, म्ह्णून त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. छत्रपतींची प्रतिष्ठा कायम ठेवणाऱ्या या महापराक्रमी ताराराणींचा पुतळा पन्हाळा गडावर व्हावा अशी अपेक्षा आहे.

प्रारंभी मंजुषा पवार यांनी स्वागत केले. यावेळी  शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, छत्रपती याज्ञसेनीराजे,संयोगिताराजे, मधुरिमाराजे, शहाजीराजे, यशराजे, यशस्वीनीराजे,गोकुळचे चेअरमन अरूण डोंगळे, अॅड. आर. एल. चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. शेवटी सुरेश शिपुरकर यांनी आभार मानले.

……………..

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे

हा देश संविधानावर चालतो, कुणाच्या मर्जीवर नव्हे

शरद पवारांच्या निवृत्तीसाठी अनेकजण वाट पहात आहेत, पण तसे होईल असे वाटत नाही

माझी कोणत्याही पदासाठी महत्त्वाकांक्षा नाही, विरोधात राहूनही धोरण ठरवू शकते

निवडणुका, हार जीत होत राहतील,  नाते महत्त्वाचे आहेत

दडपशाही विरोधात उभे रहा, तो सहन करणे म्हणजे त्याला मान्यता देणे होय


Spread the news

You may also like

error: Content is protected !!