महायुतीच्या शिष्टमंडळाची महापालिका आयुक्तांसोबत बैठक* *नागरी समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा*

Spread the news

*महायुतीच्या शिष्टमंडळाची महापालिका आयुक्तांसोबत बैठक*

 


*नागरी समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा*‚

  •  

कोल्हापूर

शहरातील विविध नागरी समस्या आणि प्रशासनातील प्रलंबित विषयांवर तातडीने निर्णय घेण्यासाठी महायुतीच्या माजी महापौर आणि नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक मा. सौ. के. मंजूलक्ष्मी यांची भेट घेऊन विस्तृत चर्चा केली.

या बैठकीत एलबीटी बंद करणे, शहरातील स्ट्रीट लाईट समस्या, रस्त्यांची दुरवस्था, महानगरपालिकेतील रिक्त पदे भरणे, शिक्षकांच्या आशास्वित श्रेणीसंदर्भातील प्रश्न, प्रोव्हिडंट फंडातील दिरंगाई यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. शिष्टमंडळाने प्रशासनाला तातडीने ठोस निर्णय घेण्याची मागणी केली असून, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

बैठकीत चर्चिलेले महत्त्वाचे मुद्दे:

*▶ एलबीटी (लोकल बॉडी टॅक्स) बंद करण्याबाबत प्रशासनाने राज्य सरकारकच्या निर्णयाची अमलबजावणी करावी .*
*▶ मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमसाठी आवश्यक निधी मंजूर करण्याची मागणी.*
*▶ एचपी ऑइल गॅस कंपनीमार्फत शहरातील रहिवाशांना भूमिगत पाइपद्वारे घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक गॅस पुरवठा करण्याच्या योजनांचा विभागनिहाय आढावा घ्यावा.*
*▶ स्ट्रीट लाईट व्यवस्थापनात एफिसिएन्सी सर्व्हिसेस लि. (EECL) कंपनीकडून होत असलेल्या दिरंगाईवर कार्यवाही करण्याची मागणी.*
*▶ २००५ नंतर महानगरपालिकेच्या सेवेत रुजू झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रोव्हिडंट फंडाची रक्कम केंद्र व राज्य शासनाच्या राष्ट्रीय पेन्शन योजनेत गुंतवण्यास होत असलेल्या विलंबामुळे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी तातडीने निर्णय घेण्याची गरज.*
*▶ महानगरपालिका आस्थापनेतील अत्यावश्यक रिक्त पदे (वर्ग १ ते वर्ग ४) तातडीने भरण्याची मागणी.*
*▶ महानगरपालिकेतील कनिष्ठ अभियंत्यांनी सेवा पूर्ण ५ वर्षे झाल्यास त्यांना शाखा अभियंता पदाचा दर्जा मिळावा. याबाबत स्थायी समिती व महासभेने पूर्वीच ठराव मंजूर केला असूनही कार्यवाही होत नसल्याबाबत नाराजी.*
*▶ महानगरपालिका शिक्षकांना आशास्वित श्रेणी व उत्पादन (ग्रॅच्युटी) रक्कम दिली जात नसल्यामुळे शिक्षकांवर होणाऱ्या अन्यायावर तातडीने निर्णय घ्यावा.*
*▶ शहरातील रस्त्यांची दुरवस्था आणि दुरुस्तीच्या कामांचा संथ वेग यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी.*
*▶ कचरा व्यवस्थापन आणि चॅनेल सफाईतील त्रुटी दूर करून स्वच्छतेसाठी ठोस पावले*
या बैठकीसाठी माजी नगरसेवक सत्यजीत (नाना) शिवाजीराव कदम यांनी पुढाकार घेत शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. यावेळी माजी महापौर सुनील कदम, माजी नगरसेवक विजय सूर्यवंशी, आशिष ढवळे, नंदू मोरे, सीमा कदम, अर्चना पागर, कविता माने, निलेश देसाई, राजसिंह शेळके, अजित मोरे, भाग्यश्री शेटके यांच्यासह शशिकांत भालकर, सचिन मोहिते, शैलेश पाटील, अभय चौगुले, अवधूत भाटे, सचिन कुलकर्णी, वैभव माने, रूपेश अडुलकर, राजू पगार आणि महायुतीचे इतर माजी नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.

महायुतीच्या शिष्टमंडळाने प्रशासनाने तातडीने या समस्यांवर ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा शहराच्या हितासाठी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला. कोल्हापूरच्या नागरी विकासासाठी महायुतीने नेहमीप्रमाणे भक्कम पाठपुरावा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!