करवीर मतदारसंघात महायुती भगवा फडकविण्यासाठी सज्ज चंद्रदीप नरके : वाकरेत कार्यकर्ते, पदाधिकारी मेळावा

Spread the news

करवीर मतदारसंघात महायुती भगवा फडकविण्यासाठी सज्ज

चंद्रदीप नरके : वाकरेत कार्यकर्ते, पदाधिकारी मेळावा

  • कोल्हापूर : पाच वर्षांत करवीर विधानसभा मतदारसंघ विकासापासून वंचित राहिला असून, येथे भगवा फडकवण्यासाठी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आणि घटक पक्ष सज्ज असल्याचे प्रतिपादन माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी केले. वाकरे (ता. करवीर) येथे शिंगणापूर जिल्हा परिषद व खुपिरे पंचायत समिती मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आर. बी. पाटील संघाचे माजी अध्यक्ष आनंदराव लहू पाटील होते.

नरके म्हणाले, ‘सव्वा दोन वर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी लोककल्याणकारी निर्णय घेतले आहेत. महायुतीच्या सरकारने लाडकी बहीण, लखपती कन्या, वयोश्री, शेतकऱ्यांना वीज बिल माफ, अशा योजना राबवल्या आहेत. मतदारसंघात बदलाचे वारे सुरू असून, जनता विधानसभेवर भगवा

फडकवणार आहे.

भाजप जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष डॉ. के. एन. पाटील यांनी शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी भाजपचे सर्व पदाधिकारी जीवाचे रान करतील, असे सांगितले

यशवंत बँकेचे माजी अध्यक्ष एकनाथ पाटील यांनी पाच वर्षांतील विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी चंद्रदीप नरके यांना विधानसभेत पाठवू या, असे आवाहन केले.

‘गोकुळ’चे संचालक अजित नरके, आकाराम पाटील (खुपिरे), कुंभी संचालक विलास पाटील, अनिल पाटील, के. डी. पाटील, अरुण पाटील, आकाश कांबळे, मानसिंग कांबळे, विलास नाळे यांनी मनोगत व्यक्त केले. ‘गोकुळ’चे संचालक एस. आर. पाटील, कुंभी कारखान्याचे उपाध्यक्ष राहुल खाडे, शिवसेना, भाजप व राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक संचालक बाजीराव शेलार यांनी केले.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!