महायुती सरकारने केलं महाराष्ट्राचं नाव बदनाम सतेज पाटील यांची जोरदार टीका

Spread the news

महायुती सरकारने केलं महाराष्ट्राचं नाव बदनाम

सतेज पाटील यांची जोरदार टीका

  • कोल्हापूर – केंद्रातील आणि राज्यातील विद्यमान सरकारकडून जनतेची फसवणूक सुरू असून, भ्रष्टाचार, महागाई आणि महिलांवरील अत्याचार अशा घटनांमुळं महाराष्ट्राचं नाव बदनाम करण्याचं काम या महायुतीच्या सरकारनं केल्याची टिका आमदार सतेज पाटील यांनी केली.
  • कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ आपटे नगर इथं आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. तुळजाभवानी कॉलनी, गणेश कॉलनी, शिवगंगा कॉलनी, वाल्मिकी नगर, व्यंकटेश कॉलनी, प्राध्यापक कॉलनी या ठिकाणी आमदार सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठका झाल्या. यावेळी नागरिकांशी संवाद साधताना आमदार सतेज पाटील यांनी, या सरकारला जनता आता कंटाळली आहे. त्यामुळं सर्वसामान्य माणसांच्या विचारांचे आमदार ऋतुराज पाटील यांना विजयी करा, असं आवाहन त्यांनी केलं. दरम्यान, आपटे नगर प्रभागातील मनसेचे माजी नगरसेवक राजू दिंडोर्ले यांचाही त्यांनी यावेळी समाचार घेतला. एखाद्या सरकारी कार्यालयातील माहिती काढायची आणि ब्लॅक मेल करायचं हाच या माजी नगरसेवकाचा उद्योग सुरु असल्याचा आरोप त्यांनी नाव न घेता केला. काँग्रेसचे माजी नगरसेवक शारंगधर देशमुख यांनी, आपटे नगर परिसरात झालेल्या अनेक विकास कामांना आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांनी भरघोस निधी दिला असल्याचं सांगितलं. मात्र येथील माजी नगरसेवकानं, ही विकास कामं मीच केल्याचे फलक लावल्याचा आरोप त्यांनी माजी नगरसेवक राजू दिंडोर्ले यांच्यावर केला.
  • आमदार ऋतुराज पाटील म्हणजे एक कॉल प्रॉब्लेम सॉल असं त्यांचं व्यक्तीमत्त्व आहे. एखाद्या नागरिकाच्या कामासाठी त्यांनी फोन केल्यानंतर ते काम झालं की नाही, याची माहितीही आमदार ऋतुराज पाटील घेतात. यावेळी सचिन सावळतकर, विकी कांबळे, राहूल काळे, योगेश सावंत, अमर पाटील, जमीर आवटी, आक्रम आवटी, निलेश जाधव, विनोद गायकवाड, प्रकाश पाटील, सुभाष साळोखे, एम डी कुंभार, महेश उपासे, अंजुम शिकलगार, विठ्ठल चौगले, सुहास पाटील, रणजित पाटील,विश्वास पाटील यांच्यासह आपटे नगर परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Spread the news

You may also like

error: Content is protected !!