- महाविकास आघाडीचा जाहीरनामा हा सर्वसामान्यांच्या उत्कर्षाचा
कोल्हापूर : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसंबंधी महाविकास आघाडीने प्रसिद् केलेला जाहीरनामा हा खऱ्या अर्थाने नागरिकांचा
वचननमा आहे. सर्वसामान्यांचा उत्कर्ष हा जाहिरनाम्याच्या केंद्रस्थानी आहे. कार्यकर्त्यामार्फत हा जाहिरनामा प्रत्येक नागरिकांपर्यत पोहोचवू
असे काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी सांगितले.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, शिवसेना ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या व
खासदार सुप्रिया सुळे आदींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मुंबई येथे जाहीरनामा प्रकाशित झाला. या जाहीरनाम्यातील महत्वाच्या बाबींची माहिती
देण्यासाठी कोल्हापुरातील स्टेशन रोडवरील काँग्रेस कमिटीत स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.
‘महालक्ष्मी योजनेंतर्गत महिलांना दरमहा तीन हजार रुपये, महिला सुरक्षितता, जातीनिहाय जनगणना, आरक्षणाच्या ५० टक्केच्या मर्यादेत
वाढ, शेतकऱ्यांना सवलती’अशा विविध योजना महाविकास आघाडीच्या जाहिरनाम्यात आहे. विकासाची ही पंचसुत्री आहे. जाहिरनाम्यात
समाविष्ठ बाबी, लोकोपयोगी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोच करण्यासाठी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते तयार आहेत.’असेही चव्हाण
यांनी स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेला काँग्रेसचे निरीक्षक सुखवंतसिंह बुऱ्हाण, आमदार हसन मोलाना, बाळासाहेब सरनाईक, महिला आघाडीच्या सरला पाटील,
भारती पोवार, तौफिक मुल्लाणी आदी उपस्थित होते.