Spread the news

उत्तरेश्वर पेठेने शाहू छत्रपतींच्या पाठीशी रहावे

मधुरिमा राजेंचे आवाहन

कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यासह शहरातील सर्वसामान्यांच्या सुख दु:खात छत्रपती घराणे सहभागी होत असते. शहराला विळखा घातलेल्या महापुरात जनतेच्या मदतीसाठी शाहू छत्रपती धावले होते. फुटबॉल, क्रिकेट, कुस्तीसह सर्व खेळ, खेळाडू, तालमीच्या मदतीसाठी शाहू छत्रपती सदैव तत्पर असतात. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील परिवर्तन चळवळीत अग्रभागी असलेल्या कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील उमेदवार शाहू छत्रपतींच्या पाठीशी उत्तरेश्वर पेठेने रहावे, असे आवाहन मधुरिमाराजे यांनी केले.

मधुरिमाराजे यांनी उत्तरेश्वर पेठ, मस्कुती तलाव परिसर, शंकराचार्य मठ परिसरात नागरिकांची भेट घेऊन इंडिया आघाडी, महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे उमेदवार शाहू छत्रपतींना निवडून आणण्याचे आवाहन केले. उत्तरेश्वर चौकातील बैठकीत लाल बावटा घाटगे पाटील कर्मचारी संघटनेने माजी संघटक सचिव किरण पोवार म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांनी राधानगरी धरण बांधून कोल्हापूरला दुष्काळमुक्त केले. सक्तीचे प्राथमिक शिक्षण, सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहे बांधलीत. उत्तरेश्वर पेठेतील नामदेव शिंपी समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह उभारले. शाहू महाराज आणि राजाराम महाराजांनी कोल्हापूर विकासात मोठे योगदान दिले असून त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी लोकसभा निवडणूकीत शाहू छत्रपतींना विजयी करावे.

रॅलीमध्ये माजी नगरसेवक उदय जगताप, शिवसेनेचे सुरेश कदम, बाळासाहेब गवळी, श्रीधर गाडगीळ, अक्षय गवंडी, केदार गाडगीळ, संजय माळवी, मदन पोवार, राहूल पोवार, तुषार नाईक, रवी पाटील, महेश आणावकर, अशोक पाटील, रोहित माने, किरण पोवार, दिलीप कदम, विकी खाडे, किरण मांगुरे, युवराज पाटील, सुजीत बेलवेकर, खंडू शिंदे, विकास पेडणेकर, अशोक पाटील, रितेश भोसले, समर्थ गंडमाळे, विनायक गवळी, निलेश मुळे, राजू पोवार, रणजीत भोसले, संग्राम शिंदे, दिलीप केसरकर, सुरेश गायकवाड, अक्षय मोरे सहभागी झाले होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!