मदन कारंडे यांना मराठा मंडळाचा पाठिंबा समाजासाठी करत असलेल्या कामाची मिळाली कारंडे यांना पोच पावती

Spread the news

 

मदन कारंडे यांना मराठा मंडळाचा पाठिंबा

समाजासाठी करत असलेल्या कामाची मिळाली कारंडे यांना पोच पावती

इचलकरंजी : येथील मराठा मंडळ यांच्या वतीने महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांना जाहीर पाठिंबा दर्शवला. मराठा मंडळ यांच्या पाठिंबामुळे कारंडे यांना स्थानिक स्तरावर अधिक बळकटी मिळाली असून समाजाच्या हितासाठी ते करत असलेल्या कार्याची पावती म्हणून हा पाठिंबा दिला आहे.
मराठा मंडळाच्या या निर्णयामुळे शहरातील मतदारांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली असून कारंडे यांना अधिक जोमाने समर्थन मिळाले आहे. शहरात हिंदुत्ववादी मते मोठ्या प्रमाणात असल्याने हा पाठिंबा महत्वाचा मानला जात आहे. यावेळी अध्यक्ष श्री आनंदराव उदाळे, उपाध्यक्ष श्री सचिनराव हळदकर, सेक्रेटरी श्री आनंदराव वाझे, खजिनदार श्री बाळासाहेब सावंत, सिव्हिक सदस्य श्री. वसंतराव पाटील, संचालक श्री राजाराम लोकरे, श्री दादासाहेब पाटील, ज्येष्ठ नेते श्री हिंदुरावजी शेळके, श्री सागरजी चाळके. श्री गणेश घाटगे, श्री सुहास जांभळे, श्री राजू गोरे, श्री राजाराम जगताप, श्री विठ्ठल येसाटे, श्री. नवाळे गुरुजी, श्री बाळासाहेब देसाई, ऑफिस सेक्रेटरी श्री सचिन रणदिवे, श्री वैभव शेवाळे, श्री बाळासाहेब सावंत,श्री विनायक चव्हाण यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!