राहुल पाटील यांच्या विजयासाठी निष्ठावंत मावळे छातीचा कोट करतील
आ सतेज पाटील यांचे प्रतिपादन
हजारोंच्या उपस्थितीत वडणगे येथे प्रचार शुभारंभ
वडणगे
स्वर्गीय पी एन पाटील यांनी श्रीपतराव बोंद्रे यांच्या नंतर करवीरची धुरा आपल्या समर्थ खांद्यावर घेऊन विकास केला आहे त्यामुळे तेच खरे करवीर चे शिल्पकार आहेत .त्यांनी कार्यकर्त्यांना स्वाभिमानाने उभे केले आहे .त्यांच्या आकस्मित जाण्याने सर्वजण पोरके झाले आहेत .त्यांचे अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी राहुल पाटील यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करून पी एन पाटील यांना श्रद्धांजली वाहूया . असे प्रतिपादन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ .सतेज पाटील यांनी केले .महाविकास आघाडीचे निष्ठावंत मावळे रात्रीचा दिवस करून राहुल पाटील यांना आमदार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला .
वडणगे येथे करवीर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस व महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल पाटील सडोलीकर यांच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी आ पाटील बोलत होते .या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी खासदार छत्रपती शाहू महाराज हे होते .आपल्या भाषणात पुढे बोलताना पाटील यांनी पी एन पाटील आणि करवीर यांचे एक वेगळे मायेचे नाते होते .मंत्रालयात देखील त्यांच्या फोनवर पाच मिनिटात कामे होत होती त्यांनी जन्मभर काँग्रेस पक्षाशी व कार्यकर्त्यांशी निष्ठा ठेवूनच राजकारण समाजकारण केले .ज्यांनी करवीरच्या विकासाचा पाया घातला व सामान्य कार्यकर्त्याला स्वाभिमानाने उभे केले त्यांच्या ऋणातून उतराई होण्याची हीच वेळ असून राहुल पाटील यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करून त्यांच्या ऋणातून उतराई होऊया असे आ .पाटील म्हणाले .राज्यात सध्यासत्तेवर असणारे सरकार भ्रष्टाचारी असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात ही त्यांनी भ्रष्टाचार करून महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा आव्हान केला आहे . बदलापूर येथे झालेल्या अत्याचाऱ्यांवर गुन्हा दाखल केले ला नाही शेतकऱ्यांचे प्रोत्साहन पर अनुदान व महापुरातील नुकसान भरपाई लटकले आहे हे सरकार केवळ इव्हेंट बाज सरकार आहे अशी टीका त्यांनी केली .उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसून व शरद पवार यांना फसवून हे सत्तेवर आले असून जर तुमच्या धमक असेल तर स्वतः ताकदीवर सत्ता स्थापन करा असे सांगून या सरकारने आंतरवाली सराटीत लाटे केलेला आहे ओबीसी व मराठा समाजात भांडणे लावले असून यांना केवळ राज्यसभेत घटना बदलण्याचा कायदा करण्यासाठी विधानसभेला बहुमत पाहिजे आहे.त्यामुळे या धर्मांध शक्तींना वेळीच पराभूत करा असे आवाहन त्यांनी केले .
यावेळी बोलताना खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांनी स्वर्गीय पी एन पाटील यांनी आपले संपूर्ण आयुष्य गोरगरिबांच्या कल्याणासाठी वाहिले होते .त्यांच्या इतका निष्ठावंत नेता राज्याच्या इतिहासात शोधून सापडत नाही .करवीर मतदार संघाचे आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासात पी .एन यांचे मोलाची योगदान आहे .त्यांचा विकासाचा वारसा राहुल पाटील हे सक्षमपणे चालवत असून त्यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करून पी एन यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाहूया .आपण स्वतःच उमेदवार असे समजून घरोघरी जाऊन मताधिक्य वाढवण्यासाठी प्रयत्न करूया असे आवाहन केले .
यावेळी बोलताना शिवसेनेचे संपर्क नेते विजय देवणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीउद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी करून सत्ता काबीज केली आहे माजी आमदार चंद्रदीप नरके हे करत असलेला शंभर कोटीच्या निधीचा दावा खोटा असून या गद्दारांना नेस्तनाबूत केल्याशिवाय शिवसैनिक थांबणार नाही असे सांगितले .सर्वच कार्यकर्त्यांना पी एन पाटील यांची मायेची उब राहुल पाटील हे देतील असे सांगून वडणगे व शिये जिल्हा परिषद मतदार संघात सर्वोच्च मताधिक्य मिळेल स्वतःचीच नाडी न समजणाऱ्या नरके यांनी आता आमदारकीचे नाव काढू नये अशी टीका त्यांनी केली .
यावेळी बोलताना माजी आमदार संपतराव पवार पाटील यांनी मी व पी एन पाटील यांनी राजकीय संघर्ष केला मात्र सुसंस्कृतपणा व पातळी कधीही सोडली नाही .त्या सुसंस्कृतपणाचे संस्कार या मतदारसंघावर आहेत .खोटे नाते बुद्धिभेदाचे राजकारण करणाऱ्यांना येथील जनता थारा देणार नाही .शे का पक्षाचे सर्व कार्यकर्ते जीवाचे रान करून राहुल पाटील यांना विजयी करण्यासाठी झटत आहेत केवळ जुजबी राजकारण करण्याऐवजी शाश्वत राजकारणाचे साक्षीदार होऊन चारित्र्यसंपन्न राहुल पाटील यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावे व बुद्धिभेद करणारे शासन उलथवून टाकावे असे आवाहन केले .धामणी प्रकल्पाबाबत चुकीचा इतिहास मांडून दिशाभूल करू नका ज्यांना स्वप्नात सुद्धा धामणी प्रकल्प दिसला नाही .त्यांनी त्याचे श्रेय घ्यायच्या भानगडीत पडू नये असा टोला चंद्रदीप नरके यांना लगावला .
यावेळी बोलताना उमेदवार राहुल पाटील सडोलीकर यांनी पी एन पाटील यांनी करवीरच्या विकासाचा पाया घातलेला असून महाविकास आघाडीच्या माध्यमातून या मतदारसंघावर विकासाचा कळस चढवायचा आहे .मी बारा महिने 24 तास सर्वसामान्यांसाठी उपलब्ध असून जनतेचा सेवक म्हणून जन्मभर काम करेन असे आश्वासन दिले .
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील गोकुळचे संचालक डॉ.चेतन नरके, दादू कामिरे,सुरेश पोवार ऊबाठा उपजिल्हाप्रमुख,युवासेना जिल्हाध्यक्ष मंजित माने,माजी सरपंच सचिन चौगले,अमर पाटील,डॉ.सुनीलकुमार पाटील,संदीप पाटील,शेतकरी संघाच्या संचालिका अपर्णा पाटील,राजवैभव शोभा रामचंद्र,तानाजी आंग्रे, समृद्धी गुरव, सागर पाटील,मानसिंग पाटील,आरपीआय चे जिल्हाध्यक्ष पांडुरंग कांबळे, अरुण मांगलेकर यांची भाषणे झाली.
यावेळी आ जयंत आसगावकर शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार, जिल्हा बँकेचे संचालक राजेश पी पाटील गोकुळचे संचालक विश्वासराव पाटील बाबासाहेब चौगुले बयाजी शेळके बाळासाहेब खाडे बी एच पाटील पन्हाळा तालुकाध्यक्ष जयसिंग हिर्डेकर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बजरंग पाटील एम जी पाटील करवीर तालुकाध्यक्ष शंकरराव पाटील हिंदुराव चौगले मल्हार सेनेचे बबनराव रानगे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाजीराव पाटील उदयानी देवी साळुंखे, शे का पक्षाचे क्रांतिसिंह पवार पाटील भोगावती कारखान्याचे अध्यक्ष प्रा शिवाजीराव पाटील सर्व संचालक प्रा टी एल पाटील मानसिंग बोंद्रे बंकट थोडगे सौ तेजस्विनी पाटील वंदना पाटील सौ शुभांगी पोवार आदींसह प्रचंड महाविकास आघाडीचे कार्यकर्ते प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित होते .
अन राहुल नतमस्तक झाले !
या व्यासपीठावर उमेदवार राहुल पी पाटील यांचे नाव भाषणासाठी पुकारल्यानंतर पाटील यांनी व्यासपीठावरच समोरच्या विराट जनसमुदायाला नतमस्तक होऊन अभिवादन केले .समोरचा जनसमुदाय पाहून त्यांच्या मनात स्वर्गीय पी एल पाटील यांच्या आठवणीने भावनांचे काहूर माजले होते . डोळ्यात अश्रू तरळले होते .पाटील हे व्यासपीठावरच नतमस्तक झाले असता उपस्थित जनसमुदायने टाळ्यांचा प्रचंड कडकडात केला त्यानंतर काही काळ सर्वजण भावना वश झाले होते .
बहिणीला गुंगीची गोळी दिली
यावेळी बोलताना माजी आमदार संपतराव पवार पाटील यांनी राज्यातील सत्तेवर असणारे सरकार केवळ जनतेला फसवण्याचे काम करत असून निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लाडक्या बहिणींना दरमहा पंधराशे रुपयांची गुंगीची गोळी देण्याचा प्रयत्न केला आहे .जनतेला आमिष दाखवून फसवणाऱ्या या लाचारसरकारला हाकलून देण्यासाठी राहुल पाटील यांना विजयी करा असे आवाहन केले .तर सतेज पाटील यांनी लोकसभेच्या निवडणुकीत बहिणीने लाटणे पाठीत घातले म्हणून आता लाडके बहीण व भाऊ आठवले आहेत अशी टीका केली .