लोकसभा निवडणुकीची शनिवारी घोषणा
बिगुल वाजणार, सात टप्प्यात होणार
निवडणुका
कोल्हापूर /प्रतिनिधी
देशातील लोकसभा निवडणुकीची घोषणा उद्या शनिवारी दुपारी तीन वाजता होणार आहे. सात टप्प्यात होणाऱ्या या निवडणुकीची आचारसंहिता उद्यापासून सुरू होणार आहे. निवडणुकीचा बिगुल उद्या वाजणार असल्याने आता राजकीय घडामोडींना प्रचंड वेग येणार आहे.
लोकसभा निवडणूक कधी घोषित होणार याबाबत देशभर प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. काल दोन निवडणूक आयुक्तांची नियुक्ती झाल्यानंतर आज त्यांची बैठक झाली. त्यामध्ये निवडणुकी संदर्भात अंतिम निर्णयाबाबत चर्चा झाली.
शनिवारी दुपारी तीन वाजता लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा होणार आहे. तीन वाजता निवडणूक आयोगाकडून पत्रकार बैठक आयोजित करण्यात आले आहे. दुपारी घोषणा होताच आचारसंहिता लागणार आहे. उद्या आचारसंहिता लागणार हे स्पष्ट झाल्यामुळे आता राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. भाजपने आणि इतर काही पक्षांनी उमेदवारांची घोषणा केली आहे. उर्वरित उमेदवारांच्या घोषणेला आता वेग येणार आहे.