कोल्हापूर
येथील लिंगायत माळी समाज महिला मंडळ कोल्हापूर जिल्हा संघटनेच्या अध्यक्षपदी वंदना माळी, उपाध्यक्ष म्हणून वैशाली माळी तर कार्याध्यक्षपदी विद्या माळी यांची निवड करण्यात आली. सचिव म्हणून श्रुती कुलगुडे तर खजानिस म्हणून भारती माळी यांची एकमताने निवड झाली.
मावळते अध्यक्ष साधना माळी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या निवडी झाल्या. माजी अध्यक्ष मीनाक्षी माळी यांनी सर्वांचे स्वागत केले. यानंतर सर्व पदाधिकाऱ्यांच्या एकमताने निवड करण्यात आले.
संचालक मंडळ : मीनाक्षी माळी, साधना माळी, रूपाली स.माळी, भारती माळी, इंदुताई माळी, रूपाली वि. माळी, उषा माळी, वनिता माळी, अर्चना माळी, शोभा संभोजे, शीला गोंधळी, भारती माळी, इंद्रायणी चौगुले, वैशाली बुबने, राजश्री बेळकुड, भाग्यश्री माळी, पुष्पा माळी, गोकुळा माळी, निर्मला माळी