*लिंगायत बिझनेस फोरम कार्यकारिणी निवड संपन्न*
अध्यक्षपदी अमरदीप पाटील, उपाध्यक्षपदी संदीप नष्टे
कोल्हापूर: लिंगायत समाजातील उद्योजक, व्यवसायिक, व्यापारी व विविध सेवा पुरवणाऱ्या बांधवांच्या ‘लिंगायत बिझनेस फोरम’च्या कार्यकारिणीची वार्षिक बैठक नुकतीच पार पाडली. चीफ पेट्रन सूर्यकांत पाटील बुदिहाळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. फोरमच्या अध्यक्षपदी अमरदीप पाटील, उपाध्यक्षपदी संदीप नष्टे, कार्यवाहपदी अविनाश बाडकर व खजानीसपदी चार्टर्ड अकाऊंटंट राहुल सव्यानावर यांची एकमताने निवड करण्यात आली. समाजातील व्यवसायिकांनी एकत्र येऊन रचनात्मक कार्य करावे यासाठी या फोरमची स्थापना करण्यात आली आहे. या बैठकीत फोरमतर्फे घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबाबत चर्चा करण्यात आली. समाजातील उद्योजकांना तसेच महिला लघु उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी व्यावसायिक प्रदर्शन घेण्यात येणार आहे. उद्योग व्यवसायात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजातील उद्योजक व व्यावसायिकांना “बिझनेस एक्सलन्स पुरस्कार” देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. तसेच विविध क्षेत्रातील तज्ञांचे मार्गदर्शनपर शिबिरे घेण्यात येणार आहेत. दरवर्षी प्रमाणे एलबीएफ प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा तसेच ट्रेकिंग इत्यादी विविध उपक्रम घेण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला. बैठकीसाठी अजय डोईजड, राहुल नष्टे, रोहन तोडकर, सिद्धांत पाटील, शिरीष साबणे, शिवकुमार पाटील, राजेश पिडशेट्टी, पुष्कर गाडवे, अमित महाळंक, अमेय हळदे व केतन तवटे उपस्थित होते.