चंदगडचा बिहार होऊ देऊ नका
विजय देवणे यांचे आवाहन
गडहिंग्लज
तालुक्यातील गुंडगिरी संपली . आता जनतेने मोकळा श्वास घेतला आहे . चंदगड तालुक्याची प्रति महाबळेश्वर करायची – देश, परदेशातील पर्यटक येथे येण्यासारखे आहे चंदगड मतदार संघाचा बिहार करायचा नाही, अशा घणाघाती टोला शिवसेना नेते विजय देवणे यांनी लगावला.
महाविकास उमेदवार डॉ. नंदिनी ळकर-कुपेकर यांच्या प्रचारार्थ येथील आयोजित परिवर्तन सभेत ते बोलत होते.
देवणे म्हणाले, मुंबईतील यांचे धंदे माहित आहेत. विद्यमान आमदार हा सरड्यासारखा रंग बदलणारा आहे. त्यांनी मतदारांचा विश्वासघात केला आहे.
यावेळी डॉ. नंदिनी बाभुळकर म्हणाल्या, माझ्या वडिलांचा फोटो तुमच्या डिजिटलवरती लावायचा तुम्हाला नैतिक अधिकार नाही. ज्या विश्वासाने आमची माणसे तुमच्या पदरात टाकली. त्यांच्यावरच सूडाचे राजकारण केला. स्व. बाबासाहेबांनी निष्ठेने राजकारण केले. साठ वर्षे पवार साहेबांची साथ कधी सोडली नाही. तुम्ही पहिल्याच टर्ममध्ये गद्दार निघालात.
यावेळी बोलताना स्वाती कोरी म्हणाल्या, एका बाजूला निष्ठा आहे. तर दुसऱ्या बाजूला विश्वासघात आहे. कपडे बदलावे तसे ते पक्ष बदलतात. हे गद्दार झाले. यावेळी नंदिनी बाबुळकर रामराजे कुपेकर यांनीही मनोगत व्यक्त केले