विधानसभेला राहुल देसाई यांच्या पाठीशी ठाम
प्रमुख कार्यकर्त्यांची बैठकीस एकमुखी ठराव
भाजप पदाधिकारी यांचे राजीनामे
कोल्हापूर
जनतेच्या विकासासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत राहुल देसाई यांच्या पाठिशी ठामपणे राहण्याचा निर्णय राधानगरी भुदरगड आजरा मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला.तर यावेळी भाजपाच्या पदाधिकारी यांनी सामुदायिक राजीनामे देण्याची घोषणा केली. देसाई ज्या पक्षातर्फे लढतील, त्यांना पाठिंबा देण्याचेही यावेळी ठरले.
भाजपाचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या संपर्क कार्यालयात पुढील दिशा ठरवण्यासाठी मतदार संघातील कार्यकर्त्यांची बैठक बोलवण्यात आली होती.अध्यक्षस्थानी माजी आमदार बजरंग देसाई होते. यावेळी गोकुळ चे माजी संचालक धैर्यशील देसाई, प्रकाश कुलकर्णी, बिद्री चे माजी संचालक धोंडीराम मगदुम प्रमुख उपस्थित होते.
राहुल देसाई म्हणाले की, ज्या अपेक्षेने व कार्यकर्त्यांच्या हितासाठी आपण भाजपात जाण्याचा निर्णय घेतला पण तेथे आपला भ्रमनिरास झाला.कार्यकर्ताच्या हिताचा विचार करून वाटचाल करणार आहोत. जेष्ठ नेते व पांडुरंग सहकार समुहाचे प्रमुख प्रकाश कुलकर्णी, भाजपाचे तालुकाध्यक्ष अनिल तळकर, गारगोटी चे लोकनियुक्त सरपंच प्रकाश वास्कर, भुदरगड तालुका संघाचे संचालक नारायण पाटील, तालुका संघाचे माजी संचालक सदाशिव देवर्डेकर , गोकुळचे माजी संचालक धैर्यशील देसाई, एम एम कांबळे , बी एस पाटील, शिवाजी वारके शशिकांत फराकटे , प्रताप मेंगाणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले …
तर या कार्यक्रमास अरुंधती संदीप पाटील ( संचालक बिद्री ) किरण कुरडे सुरेश खोत , नामदेव पाटील, (अर्जुनवाडा) रंगराव पाटील शेळेवाडी ,एस एल पाटील चंद्रे , भीमराव रेपे सरवडे साईराज कावनेकर पनोरी
शांताराम तॏंडकर कासारवाडा,एमडी पाटील ,अर्जुन पाटील ,सुनील देसाई
दगडू राऊळ ,राजू दबडे सुदेश सापळे
रवींद्र पारकर , बाबासाहेब जाधव भोई,सिराज देसाई,सागर भाट, संतोष चव्हाण, शुभम मगदुम ,संजय देसाई, एच डी देसाई , नारायण पाटील दिग्वीजय कुलकर्णी ,रंगराव बावस्कर प्रमुख उपस्थित होते
स्वागत व प्रास्ताविक बजरंग कुरळे यांनी केले तर आभार नारायण पाटील यांनी मानले.