*जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांचे कोल्हापूरात जल्लोषी स्वागत*
*अध्यक्षपद मिळाल्यानंतर पहिल्यांदाच कोल्हापूरात आगमन*
कोल्हापूर ः महाराष्ट्र सरकारतर्फे जैन समाजाच्या धार्मिक, सामाजिक व आर्थिक विकासासाठी जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात आले आहे. सदर महामंडळाच्या अध्यक्षपदाचा प्रथम मान हा कोल्हापूरला मिळाला. अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांना महामंडळाचे प्रथम अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.
नियुक्ती झाल्यानंतर ललित गांधी यांचे पहिल्यांदाच कोल्हापूर मध्ये रेल्वे स्टेशन ला आगमन झाले. यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील विविध संघटना, जैन समाजातील विविध संघटना यांचे किमान 700 ते 800 नागरीकांच्या उपस्थितीत ललित गांधी यांचे फुलांच्या वर्षावात, तुतारी व ढोल ताशांच्या गजरात जल्लोषी स्वागत करण्यात केले.
ललित गांधी हे गेली अनेक वर्ष सामाजिक, राजकीय क्षेत्रात कार्यरत आहे या कार्याची पोचपावती म्हणून राज्यसरकारने जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या पहिल्या अध्यक्षपदाचा मान ललित गांधी यांना दिला. मंत्री पदाचा दर्जा असलेले पद मिळाल्यामुळे समाजात प्रचंड उत्साह निर्माण झाल्याचे दिसुन येत होता.
स्वागता समारंभावेळी बोलताना ललित गांधी म्हणाले की, सदर पदाचा उपयोग हा महाराष्ट्रामध्ये जैन समाज व त्यांच्या विविध पोटजातीतील आर्थिक व सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या जैन समाजातील युवक, महिला व सर्व घटकांना विविध योजनांचा लाभ मिळवुन जैन समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी व आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार आहे असे प्रतिपादन केले.
यावेळी भरत गांधी, सत्यजित कदम, महाराष्ट्र चेंबर चे उपाध्यक्ष रमाकांत मालु, कोल्हापूर चेंबर चे अध्यक्ष संजय शेठे, धनंजय दुग्गे, गुजरी संघाचे अध्यक्ष नरेंद ओसवाल, लक्ष्मीपूरी संघाचे कांतीलाल ओसवाल, भक्तीपुजानगर ट्रस्ट चे अध्यक्ष राजेंद्र ओसवाल, भरत ओसवाल, विजय यादव, प्रशांत पोकळे, जयेश ओसवाल, किशोर राठोड, ॠषभ भंडारी, दिलीप गांधी, प्रदीप जैन, हिरालाल गांधी, हिराचंद खिंवसरा, मेघ गांधी, दर्शन गांधी यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील येथील नागरीक मोठ्या संयेने उपस्थित होते.