लाडक्या बहिणीच चंद्रदीप नरकेंच्या विजयाच्या शिल्पकार असतील :
वृषाली श्रीकांत शिंदे
– महायुतीच्या सरकारने जनतेची विकासकामे केली. भविष्यातही योजना कायम सुरू ठेवण्यासाठी मुख्यमंत्री साहेबांचे हात बळकट करण्यासाठी करवीरच्या जनतेने चंद्रदीप नरके यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन करत करवीरमधील लाडक्या बहिणीच नरके यांच्या विजयाच्या शिल्पकार असतील असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्नुषा वृषाली श्रीकांत शिंदे यांनी केले.
शिये जिल्हा परिषद मतदारसंघातील महिला मेळाव्या प्रसंगी त्या बोलत होत्या. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी वडणगेच्या सरपंच संगिता पाटील होत्या.
यावेळी वृषाली शिंदे म्हणाल्या, दोन वर्षांपूर्वी महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर सर्वसामान्य जनतेसाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याची दारे चोवीस तास खुली झाली आहेत. आजपर्यंत कधी झाली नाहीत इतकी विकासकामे आणि वैयक्तिक लाभाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यात युती सरकार यशस्वी झाले आहे. यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. हे नेते आता याच योजनेची चोरी करून आपण अशा योजना राबवणार असल्याच्या वल्गना करत आहेत. पण इतर राज्यात त्यांनी केलेल्या घोषणा फसव्या ठरल्या असुन योजना आणि विकासाचा धूम धडाका सुरू ठेवण्यासाठी महायुती सरकार सत्तेत येणे गरजेचे आहे. करवीर मधील लाडक्या बहिणीच चंद्रदीप नरके यांच्या विजयाच्या शिल्पकार असतील असे शिंदे यांनी सांगितले.
यावेळी शिवसेना उपनेत्या शितल म्हात्रे म्हणाल्या, मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी मुलींना मोफत शिक्षण, एसटी बस मध्ये पन्नास टक्के सवलत देऊन महिलांना मोठी संधी दिली तर शेतकर्यांना योजना देऊन हात बळकट केले असल्याचे सांगितले.
यावेळी शिल्पा नरके म्हणाल्या, चंद्रदीप नरके आमदार नसतानाही जनता त्यांना आमदार म्हणून संबोधते. ही विजयाची नांदी आहे.नरके साहेबांनी वडणगे गावातील जिव्हाळ्याच्या शिवपार्वती तलावासाठी पंधरा कोटींचा निधी देऊन वाहव्वा मिळविली असल्याने त्यांना मोठे मताधिक्य मिळणार यात शंका नाही.
यावेळी पक्ष निरीक्षक शारदा जाधव, शिवसेना जिल्हा महिला आघाडी प्रमुख शुभांगी पोवार, देविका नरके-फाटक, ऐश्वर्या पोळ- नरके, शितल यादव, निता पाटील, माजी जि.प. सदस्या कोमल मिसाळ यांनी प्राजक्ता कुडाळकर मनोगते व्यक्त केली.
यावेळी चिखलीच्या माजी सरपंच उमा पाटील, शारदा पोवार, प्रमिलादेवी पाटील, योगिता पाटील, गायत्री पाटील, वंदना तावडे यांचेसह वडणगे पं.स. व शिये जिल्हा परिषद मतदारसंघातील महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.
चौकट : अजमेर (राजस्थान) येथे पर्यटनासाठी गेलेल्या वरणगे-पाडळी येथील ग्रामस्थांचा मोठा अपघात झाला. त्यावेळी नरके साहेबांनी स्वत: अपघातस्थळी धाव घेऊन जखमींना मदत केली तर मयत व्यक्तीचे शव स्वत: वरणगे येथे घेऊन आले. त्याचप्रमाणे चिखली, आंबेवाडी, वरणगे पाडळी, शिये परिसरात आलेल्या महापूराच्या संकटात जिवाची पर्वा न करता त्यांनी पुरग्रस्तांना केलेली मदत आम्ही कधीही विसरणार नाही असे प्राजक्ता शिवाजी कुडाळकर यांनी सांगितले.