के.पी.पाटील ट्रक ड्रायव्हर ते 3 हजार कोटींचे मालक- आमदार प्रकाश आबिटकरांचा घणाघाती आरोप : बिद्रीत दरवर्षी २५ कोटींचा भ्रष्टाचार

Spread the news

के.पी.पाटील ट्रक ड्रायव्हर ते 3 हजार कोटींचे मालक- आमदार प्रकाश आबिटकरांचा घणाघाती आरोप
: बिद्रीत दरवर्षी २५ कोटींचा भ्रष्टाचार

ठिकपुर्ली : प्रतिनिधी,
गलगले, कोंडूशी, बोरवडे येथील शेकडो एकर जमीन तर मुदाळ येथील शिक्षण संस्था, बेंगलोरला आलीशान हॉटेल, बिद्री कारखान्यातील दरवर्षी २५ कोटींचा भ्रष्टाचार करणाऱ्या माजी आमदार के.पी.पाटील यांचा प्रवास एक ट्रक ड्रायव्हर ते 3 हजार कोटींचा मालक असल्याचा घणाघाती आरोप महायुतीचे उमेदवार प्रकाश आबिटकर यांनी ठीकपुर्ली येथील कोपरा सभेत बोलताना केला. आमदार आबीटकर यांच्या आरोपामुळे राधानगरी मतदारसंघात मोठी खळबळ माजली आहे.

आमदार आबिटकर म्हणाले, के. पी. पाटील यांची कातडी गेंड्याची आहे. अशा निगरगट्ट माणसाला समाजाचे कोणतेही देणे-घेणे नाही. निवडणूक आली की केवळ मते मागण्यासाठी लोकांच्याकडे जाऊन बुद्धिभेद करायचा आणि आपली पोळी भाजून घ्यायचा त्यांचा नेहमीचाच उद्योग आहे. निष्क्रीय उमेदवार के.पी.पाटील यांनी आमदार असताना काय दिवे लावलेत हे राधानगरी विधानसभा मतदार संघातील स्वाभिमानी जनतेला चांगलेच ठावूक आहे. के.पी.पाटील मतदार संघाचे कागल करतो असे वारंवार तोंडाची बाष्कळ वाफ घालवत पण त्यांनी 10 वर्षाच्या कार्यकाळात लबाडी करण्यात घालवले. मी माझ्या आमदारकीच्या मागील 10 वर्षात मतदार संघाचा विकासाचा बॅकलॉक भरुन काढला असून राज्यातील सर्वोत्तम मतदार संघ करण्यासाठी प्रयत्न करत आहे. ठिकपुर्ली या गावाची ओळख राजकारण करणारे गाव म्हणून होती परंतू मागील 10 वर्षाच्या कार्यकाळात आपण यामध्ये बदल घडवून विकासाभिमुख गाव अशी नवीन ओळख या गावाची बनवलेली आहे. गावातील रेणूका देवीचा आशिर्वाद, मातंग समाज, मागासवर्गीय समाज माझ्या पाठीशी आहे. त्यामुळे ठिपकुर्लीत मताधिक्य मिळेल असे सांगितले. उत्कृष्ठ संसदपटू म्हणून पुरस्कार मिळवणारा मी कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव आमदार हा तुमचा आमदार आहे. या पुढे देखील मतदार संघाचे अविरतपणे काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे.

यावेळी बोलताना अरुणराव जाधव म्हणाले की, ठिकपुर्ली गावातील एका मावशीने आमदार आबिटकर यांनी चांगले काम केले असल्याची उत्सफुर्त प्रतिक्रिया दिली पण नेते मंडळींनी दबावतंत्र राबवत आहेत. पण जाईल तेथे सर्वच नागरीक आमदार आबिटकर यांच्या विषयी चांगल्या प्रतिक्रिया देत असल्यामुळे के.पी.पाटील यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. यामुळे ते खालच्या पातळीवर जाऊन आमदार आबिटकर यांचेवर वैयक्तिक टिका-टिप्पण्णी करत आहेत. आमदार आबिटकर सन 2014 साली आमदार झाल्यानंतर त्यांनी आजतागायत ठिकपुर्ली गावातील विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावले आहेत.
यावेळी बोलतना युवानेते अभिषेक डोंगळे म्हणाले, आमदार प्रकाश आबिटकर यांनी ठिकपुर्ली गावास 9 कोटी हून अधिक निधी दिला असून के.पी.पाटील यांनी या गावास 10 वर्षाच्या काळात किती निधी दिला हे प्रथम जाहीर करावे. आमदार आबिटकर व के.पी.पाटील यांच्या 10 वर्षाच्या काळात केलेल्या कामांचे मुल्यमापन येथील जनतेने करावे.

यावेळी सरपंच प्रल्हाद पाटील, उपसरपंच शिवाजी साठे, माजी सरपंच राजेंद्र चौगले, चंद्रकांत संकपाळ, आनंदा पाटील, भिवाजी पाटील, हिंदूराव म्हाळुंगेकर, विजय चौगले, लहूजी जरग, सुरेश भोई, अमित चौगले, संग्रामसिंह चौगले, शहाजी कांबळे, साताप्पा कांबळे, आदी उपस्थित होते. प्रस्ताविक सुनिल चौगले यांनी केले. आभार सुनील चौगले यांनी मानले.

चौकट ………………………….
केपींच्या धनशक्तीला जनता भिक घालणार नाही….
माजी आमदार के. पी. पाटील यांना जनतेतून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे त्यांनी आता गावा-गावात एजंट सोडून धनशक्तीचा वापर सुरू केला आहे मात्र राधानगरीची सुज्ञ जनता या आमिषाला बळी न पडता विकास कामे करणाऱ्या आमदार आबीटकर यांच्या पाठीशी राहील असे अरुण जाधव यांनी सांगितले.
………………………….

फोटो : ठिकपुर्ली येथील कोपरा सभेत बोलताना आमदार प्रकाश आबीटकर व समोर उपस्थित जनसमुदाय.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!