Spread the news

कोल्हापूरकरांचा पर्यावरणपूरक विसर्जनाकडेच कल

यंदाच्यावर्षी लहान व मोठया मिळून 59 हजार 899 गणेश मुर्तीचे विसर्जन : दहा दिवसात 200 टन निर्माल्य जमा

 

कोल्हापूर ता.19 :- महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने घरगुती व सार्वजनिक मंडळांनी यंदाचा गणेशोत्सव पर्यावरण पूरक करावा असे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनास प्रतिसाद देऊन कोल्हापूरांनी पर्यावरणपूरक विसर्जनाकडे कल देऊन कोल्हापूरची परंपरा कायम राखली. महापालिकेच्यावतीने शहरात घरगुती व सार्वजनिक विसर्जना दरम्यान 238 ठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंड ठेवण्यात आले होते. या कुंडामध्ये कोल्हापूरकरांनी गणेश मुर्ती विसर्जित करुन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यंदाच्यावर्षी लहान व मोठया मिळून 59 हजार 899 गणेश मुर्तीचे इराणी खणीमध्ये पर्यावरणपूरक विसर्जन करण्यात आले. या विसर्जनासाठी मिरवणूक मार्गावर व विसर्जनाच्या ठिकाणी पवडी, आरोग्य, उद्यान व इतर विभागाचे 3000 कर्मचारी, 215 टँम्पो 770 हमाल, 5 जे.सी.बी., 7 डंपर, 4 टॅक्टर, 4 पाण्याचे टँकर, 2 बुम, 6 ॲम्बुलन्स व 10  फलोटींगचे तराफे, चार क्रेन, स्वयंचलित यंत्र अशी व्यवस्था करण्यात आली होती.

महापालिकेच्या मुर्तीअर्पण आवाहनास शहरातील नागरीकांनी व अनेक मंडळांनी प्रतिसाद देवून गणेशमुर्ती पर्यावरणपूकर विसर्जित केलेबद्दल सर्व नागरिकांचे व सार्वजनिक मंडळाच्या अध्यक्ष, प्रतिनिधींचे प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी आभार व्यक्त केले आहे. या पर्यावरणपूरक गणेश उत्सवासाठी महापालिकेची सर्व यंत्रणा गेले पंधरा दिवस रात्रदिवस काम करत होती. हा उत्सव चांगल्या पध्दतीने पार पाडण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्व अधिकारी, आरोग्य, पवडी, सफाई, विद्युत व इतर विभागाचे कर्मचारी, अग्निशमन जवान, वैद्यकीय पथक व विविध सेवाभावी संस्थांनी विशेष परिश्रम घेतले असल्यांने त्यांचे मनापासून आभार प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी व्यक्त केले.

घरगुती व सार्वजनिक विसर्जना दरम्यान आरोग्य विभागाकडून विर्सजनाच्या ठिकाणाहून 200 मे.टनाहून अधिक निर्माल्य उठाव करून त्याच्यावर खत प्रक्रिया करण्यास पुढे पाठविण्यात आले. त्याचबरोबर उत्सवाच्या काळात दैनंदिन स्वच्छता, विसर्जनापुर्वी व विसर्जनानंतर तातडीने सर्व ठिकाणांची स्वच्छता करण्यात येत होती. यासाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी रात्रदिवस काम करत होते.

000000000000000000000


Spread the news

You may also like

error: Content is protected !!