कोल्हापूरच्या मर्दानी खेळाला भारतातील सर्वोत्तम राष्ट्रीय पुरस्कार जाहीर ~ राजर्षी शाहू महाराजांनी जपलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारशाला मिळाला सन्मान.

Spread the news

कोल्हापूरच्या मर्दानी खेळाला भारतातील सर्वोत्तम राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

~ राजर्षी शाहू महाराजांनी जपलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारशाला मिळाला सन्मान.9

~ कोल्हापूरच्या कला,क्रीडा व सांस्कृतिक विश्वासाठी महत्वाची घटना.

सचिन बाळासाहेब सूर्यवंशी यांनी मर्दानी खेळावर तयार केलेल्या महितीपटाला 2022 चा राष्ट्रीय पुरस्कार पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार Art and cultural या कॅटगीरीत मिळाला. ऑक्टोबर 2024 मध्ये मा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते विज्ञान भवन दिल्ली येथे हा पुरस्कार देण्यात येणार आहे. भारतातील चित्रपट क्षेत्रामध्ये हा पुरस्कार सर्वोच्च समजला जातो.

या फिल्म साठी सलग दोन वर्षे रिसर्च व शूटिंगचे काम कोल्हापुरात झाले.

कोल्हापूरच्या कला व क्रीडाविश्वासाठी ही मोठी आनंदाची व अभिमानाची गोष्ट आहे. फुटबॉलवेड्या कोल्हापुरात मर्दानी खेळाचे आखाडे अजूनही तग धरून आहेत. मर्दानी खेळाडू व त्यांना घडविणारी वस्ताद मंडळी स्वतःच्या खिशाला झळ लावून हा खेळ जपत आहेत ते केवळ शिवरायांवरील प्रेमापोटीच.

मर्दानी खेळ म्हणजे शिवकालीन युद्धकला. या युद्धकलेच्या जोरावर शिवाजी महाराजांनी आपल्या साम्राज्याचा विस्तार केला. शिवाजी महाराजांचे मावळे मर्दानी खेळात निपुण होते. हा युद्धकलेचा वारसा जपण्यासाठी कोल्हापुरातील स्थानिक कसा प्रयत्न करत आहेत हे या माहितीपटात दाखवण्यात आले आहे. वस्तादांच्या व खेळाडूंच्या मुलाखती,मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके असे या पंचवीस मिनिटांच्या माहितीपटाचे स्वरूप आहे.

चौकट-
हा पुरस्कार मी शिवरायांच्या मावळ्यांना तसेच ही युद्धकला जपलेल्या सर्व खेळाडू व तालमींना अर्पण करतो.
– *सचिन बाळासाहेब सूर्यवंशी*

चौकट-
आपली मुलं परदेशातील खेळ खेळतात कारण त्या खेळात करियर करता येते.आपल्या मातीतल्या या खेळाला शालेय क्रीडाप्रकारात कुठेलेच स्थान नाही. .शासनाने मर्दानी खेळाला शालेय क्रीडाप्रकारात स्थान द्यावे. असे झाले तर शिवरायांचा हा समृद्ध वारसा जपला जाईल. अशी इच्छा सचिन सूर्यवंशी यांनी व्यक्त केली.

सचिन सूर्यवंशी हे मागील काही वर्षांपासून मर्दानी खेळावर संशोधन तसेच अभ्यास करत होते. पडद्यावर भव्य दिव्य स्वरूपात दिसणाऱ्या माहितीपट तयार करण्यासाठी तब्बल तीस लाख इतका खर्च झाला आहे. हा माहितीपट बनवताना सचिन यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. तरी माघार न घेता स्वतःच्या जिद्दीच्या जोरावर त्यांनी हा माहितीपट पूर्ण केला.
सचिन सूर्यवंशी यांना बॉलिवूडमध्ये सर्वोच्च मानला जाणारा फिल्मफेअर पुरस्कार 2019 (सॉकर सिटी) आणि 2022 (वारसा) दोन वेळा मिळाला होता.

माहितीपटाचे नाव- वारसा

लेखक, निर्माता, दिग्दर्शक – सचिन बाळासाहेब सूर्यवंशी

निर्मिती – लेझी लिओ फिल्म्स
सह-निर्माते -सिद्धेश सांगावकर, संदीप बंडा पाटील, प्रसाद पाध्ये, सतीश सूर्यवंशी, चिन्मय जोशी, कविता ननवरे, कुणाल सूर्यवंशी
नरेशन – डॉ. शरद भुताडीया
संगीत – अमित पाध्ये
एडीट – प्रशांत भिलवडे
साउंड डिझाईन- मंदार कमलापूरकर
इलस्ट्रेशन्स- विनायक कुरणे
अ‍ॅनिमेशन- किरण देशमुख
व्हीएफएक्स – प्रदीपकुमार जाधव
पब्लिसिटी – सचिन गुरव”


Spread the news

You may also like

error: Content is protected !!