कोल्हापुरात भर दिवसा रस्त्यावर दगडाने ठेचून युवकाचा खून

Spread the news

­कोल्हापुरात भर दिवसा रस्त्यावर दगडाने ठेचून युवकाचा खून

कोल्हापूर

कोल्हापुरात मंगळवारी दुपारी भर दिवसा राजारामपुरीत एका युवकाचा दगड आणि काठीने ठेचून खून करण्यात आला. कनाननगर येथील पंकज भोसले असे या युवकाचे नाव असून चौघांनी त्याचा खून केला.
राजारामपुरी पोलीस स्टेशन पासून जवळच असलेल्या दीपा गॅस एजन्सी जवळ दुपारी हा प्रकार घडला. चार युवकांनी काठी आणि दगडाने ठेचून पंकज भोसले याचा खून केला. रस्त्यावरच झालेल्या या प्रकाराने एकच खळबळ उडाली. घटनास्थळी तातडीने पोलीस अधिकाऱ्यांनी भेट दिली आणि पंचनामा केला.

याप्रकरणी दोघांना ताब्यात घेणे घेतले असून आणखी दोघे फरार असल्याचे समजते. भर चौकात गेल्या काही महिन्यात झालेला हा तिसरा खून आहे. यामुळे कोल्हापुरात भीती व्यक्त होत आहे.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!