कोल्हापूर ते दिल्ली या मार्गावर २७ ऑक्टोबरपासून थेट विमानसेवा, खासदार धनंजय महाडिक यांचा यशस्वी पाठपुरावा, नागपूर आणि गोवा मार्गावरही विमानसेवा सुरू होण्याचे संकेत*

Spread the news

*कोल्हापूर ते दिल्ली या मार्गावर २७ ऑक्टोबरपासून थेट विमानसेवा,

खासदार धनंजय महाडिक यांचा यशस्वी पाठपुरावा, नागपूर आणि गोवा मार्गावरही विमानसेवा सुरू होण्याचे संकेत*

कोल्हापूर

प्रदिर्घ काळापासून प्रलंबित असलेली कोल्हापूरकरांची एक मागणी आता पुर्ततेच्या अंतिम टप्प्यात आली आहे. २७ ऑक्टोबरपासून कोल्हापूर ते दिल्ली या मार्गावर थेट विमानसेवा सुरू होईल. इंडिगो कंपनीचे सुमारे १८० आसन क्षमतेचे विमान, कोल्हापूर-दिल्ली-कोल्हापूर या मार्गावर उड्डाण करेल. खासदार धनंजय महाडिक यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे कोल्हापूर ते दिल्ली विमानसेवा सुरू होण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. याशिवाय कोल्हापूर ते नागपूर आणि कोल्हापूर ते गोवा या मार्गावरील विमानसेवाही लवकरच सुरू होण्यासाठी खासदार महाडिक प्रयत्नशिल आहेेत.
दक्षिण काशी कोल्हापूर ते देशाची राजधानी दिल्ली या मार्गावरील विमानसेवा २७ ऑक्टोबरपासून सुरू होण्याचे स्पष्ट संकेत आहेत. खासदार धनंजय महाडिक यांनी त्याबद्दलची माहिती दिली. इंडिगो कंपनीचे ए थ्रीट्वेंटी हे १८० आसन क्षमतेचे एअरक्राफ्ट, २७ ऑक्टोबरपासून कोल्हापूरकरांना सेवा देईल. कोल्हापूर-दिल्ली-कोल्हापूर या मार्गावर हवाई सेवा सुरू होण्याचा प्रस्ताव, सध्या भारतीय विमान पतन प्राधिकरणाच्या महासंचालकांकडे अंतिम टप्प्यात आहे. लवकरच त्याला मान्यता मिळेल आणि कोल्हापूर-दिल्ली थेट विमानसेवा सुरू होईल, अशी माहिती खासदार महाडिक यांनी दिली. सकाळी १० वाजून १० मिनिटांनी दिल्लीतून विमान उड्डाण करेल आणि दुपारी १२ वाजून ५५ मिनिटांनी विमान कोल्हापुरात येईल. त्यानंतर १ वाजून २५ मिनिटांनी कोल्हापूर विमानतळावरून उड्डाण होईल आणि सायंकाळी ४ वाजून १५ मिनिटांनी, विमान दिल्लीला पोचेल. अनेक वर्षापासून कोल्हापूर-दिल्ली थेट विमानसेवा सुरू व्हावी, अशी उद्योजक, कारखानदार यांची मागणी होती. त्याला आता मुर्त स्वरूप येण्याची स्पष्ट चिन्हं आहेत. त्याचबरोबर कोल्हापूर ते नागपूर आणि कोल्हापूर ते गोवा या मार्गावर सुध्दा विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे. त्याचाही पाठपुरावा सुरू असल्याचं खासदार महाडिक यांनी सांगितले.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!