कोल्हापूर खंडपीठाबाबत मुख्य न्यायमूर्ती  यांच्याशी सकारात्मक चर्चा

Spread the news

कोल्हापूर खंडपीठाबाबत मुख्य न्यायमूर्ती  यांच्याशी सकारात्मक चर्चा

  1. U­

 


मुंबई उच्च न्यायालय येथे रूम नंबर 55 या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश श्री आलोक आराध्य तसेच मुंबई उच्च न्यायालयातील प्रशासकीय न्यायमूर्ती मान. श्री ए. एस. चंदुरकर मान. श्री. एम. एस. सोनक साहेब मान. श्रीमती रेवती मोहिते-ढेरे पाटील मान. श्री. रविंद्र व्ही. घुगे साहेब यांचे सोबत कोल्हापूर या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच स्थापन व्हावे याकरिता मुंबई उच्च न्यायालय कोल्हापूर खंडपीठ कृती समिती यांना देण्यात आलेल्या वेळेनुसार आज सायंकाळी 4:45 वाजता बैठक झाली. सदरची बैठक अत्यंत नम्रतापूर्व व खेळीमेळीमध्ये पार पडली

  •  

सदर बैठकीमध्ये मुंबई उच्च न्यायालय कोल्हापूर खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक ॲड. सर्जेराव खोत यांचे सह ॲड संतोष शहा ॲड. संग्राम देसाई यांनी कोल्हापूर या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच स्थापन करण्याकरिता योग्य परिस्थिती उपलब्ध आहे याबाबत माननीय सरन्यायाधीश व प्रशासकीय न्यायमूर्ती यांचे समोर पीपीटी प्रेसेंटेशन देण्यात आले. त्यामध्ये कोल्हापूरची भौगोलिक परिस्थिती, कोल्हापूर विभागातून मुंबई उच्च न्यायालयामध्ये असणारे प्रलंबित खटले त्याचबरोबर भौगोलिक व ऐतिहासिक दृष्ट्या कोल्हापूरचे महत्त्व आणि कोल्हापूर या ठिकाणी सर्किट बेंच स्थापन करण्याकरिता असणारे अत्यंत पूरक वातावरण, विमानसेवा, रेल्वे सेवा त्याचबरोबर पक्षकारांना न्यायिक सुविधा न्याय आपल्या दारी या संकल्पनेतून मिळावेत याकरिता कोल्हापूर सह सहा जिल्ह्यांपासूनचे मुंबई पर्यंतचे अंतर व कोल्हापूर या ठिकाणी सर्किट बेंच स्थापन झाल्यास पक्षकांची होणारी सोय व न्यायाची गरज अशा सर्व विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. चर्चेच्या दरम्यान आदरणीय सरन्यायाधीशांनी कोल्हापूरची मागणी 35 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बाबतच्या प्रदीर्घ प्रवासाचा उल्लेख करत आजपर्यंतच्या सर्व निवेदन व कृती समितीच्या वतीने केलेला पाठपुरावा याचा अभ्यास करून निर्णय करणे गरजेचे आहे व अभ्यास करून त्याचा निर्णय देण्यात येईल असे सांगितले.

त्याचप्रमाणे चर्चेसाठी आलेल्या शिस्ट मंडळास अत्यंत आदरपूर्वक अशी भेट दिली. मुंबई उच्च न्यायालयाचे सन्माननीय सरन्यायाधीश यांनी अत्यंत नम्रतापूर्वक शिष्टमंडळासोबत चर्चा केली त्यामुळे आपणास सांगताना मला विशेष आनंद होतो की ज्या नम्रतेने शिष्टमंडळासोबत त्यांनी चर्चा केली सर्व परिस्थिती जाणून घेतली त्यामुळे त्यांच्या कालावधीमध्ये निश्चितपणे निर्णय होईल अशी आशा करण्यास हरकत नाही.

माननीय सरन्यायाधीशांनी केवळ पाचच लोकांना शिष्टमंडळामध्ये समाविष्ट होण्यास बंधन घातल्यामुळे सुरुवातीस कोल्हापूर खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक ॲड. सर्जेराव खोत यांचे सह ॲड संतोष शहा ॲड. संग्राम देसाई, श्री वसंतराव भोसले आणि श्री विवेक घाडगे हे सहभागी होते त्यानंतर माननीय सरन्यायाधीश यांना विनंती केले वरून शिष्टमंडळासोबत सहभागी होण्याकरिता सातारा बारचे अध्यक्ष विकास पाटील सांगली बार असोसिएशनचे अध्यक्ष किरण रजपूत कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे सेक्रेटरी निशिकांत पाटोळे रत्नागिरी बारचे उपाध्यक्ष निनाद शिंदे सांगलीचे एडवोकेट श्रीकांत जाधव कराड चे अडवोकेट संभाजी मोहिते हे सर्वजण उपस्थित होते सदर सिस्टमंडळाने भेट घेतली त्या दरम्यान खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक एडवोकेट सर्जेराव खोत यांचे हस्ते मुंबई उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश श्री अलोक आराध्य यांना शाल, श्रीफळ, पानविडा त्याचप्रमाणे कोल्हापुरी फेटा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे सदर सत्काराच्या समयी कोल्हापूरची महालक्ष्मी श्री अंबाबाई हिचा फोटो आदरणीय सरन्यायाधीश यांना देण्यात आला त्याचप्रमाणे आदरणीय सरन्यायाधीश त्याचप्रमाणे आदरणीय प्रशासकीय न्यायमूर्ती यांना स्वातंत्र्य लढ्यामध्ये महाराष्ट्राचे योगदान या विषयावर लिखित पुस्तक भेट म्हणून देण्यात आले अशा प्रकारे अत्यंत खेळीमुळे मध्ये सदरची बैठक पार पडली

त्याचप्रमाणे सदर बैठकीच्या दरम्यान पूरक वातावरणाचे औचित्य साधून खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक एडवोकेट सर्जेराव खोत यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश व इतर प्रशासकीय न्यायमूर्ती यांना कोल्हापूर या ठिकाणी येण्याकरिता निमंत्रित केले अत्यंत नम्रपने आदरणीय सरन्यायाधीश व प्रशासकीय न्यायमूर्ती यांनी सदरची विनंती मान्य केलेली आहे.

आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये शिष्टमंडळासोबत मदत करण्याकरिता कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे जॉईंट सेक्रेटरी राजू ओतारी, लोकल ऑडिटर कर्णकुमार पाटील तसेच माजी अध्यक्ष ॲड. रणजीत गावडे, शिवाजीराव राणे ,राजेंद्र चव्हाण, प्रशांत शिंदे ,अजित मोहिते, त्याचप्रमाणे एडवोकेट राजेंद्र मंडलिक ,पिराजी भावके, सुनील गावडे ,विजय महाजन, आर .आर.तोष्णीवाल ,अमित सिंग इत्यादी हे उपस्थित होते.

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!