कोल्हापूर जिल्ह्यातील NMMS शिष्यवृत्तीधारक मुलांना मिळणार कोट्यवधींची शिष्यवृत्ती.डॉ एकनाथ आंबोकर*

Spread the news

*कोल्हापूर जिल्ह्यातील NMMS शिष्यवृत्तीधारक मुलांना मिळणार कोट्यवधींची शिष्यवृत्ती* *डॉ एकनाथ आंबोकर*

  1. U­

 


केंद्र शासन मार्फत घेण्यात येणाऱ्या राष्टीय आर्थिक व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये कोल्हापूर जिल्हा राज्यात प्रथम येण्याची आपली परंपरा कायम ठेवली आहे.
2024-25 मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातून 27437 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्या पैकी 1703 विद्यार्थी राष्ट्रीय गुणवत्ताधारक झाले असून प्रति विद्यार्थी 12000 रुपये या प्रमाणे पुढील चार वर्षे शिष्यवृत्ती मिळणार आहे अर्थात एका विद्यार्थ्याला 48000 इतकी शिष्यवृत्ती मिळणार आहे. तर 1703 विद्यार्थ्यांना 8 कोटी 17 लक्ष 44 हजार इतकी चार वर्षात राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळणार आहे.
सारथी शिष्यवृत्ती साठी सुमारे 12000 विद्यार्थी पात्र आहे. सारथी साठी एका विध्यार्थ्याला 9600 प्रति वर्षी या प्रमाणे पुढील चार वर्षे शिष्यवृत्ती मिळणार आहे. म्हणजे प्रति विद्यार्थी चार वर्षात 38400 रुपये इतकी शिष्यवृत्ती मिळणार असून 12000 विध्यार्थ्यांना चार वर्षात 46 कोटी 8 लक्ष एवढी रक्कम मिळणार आहे. राष्ट्रीय व सारथी शिष्यवृत्ती मिळून 54 कोटी 23 लक्ष 44 हजार
येवढ्या मोठया रक्कमेने शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी शिक्षक, मुख्याध्यापक, संस्था चालक, केंद्रप्रमुख, विस्ताराधिकारी,गटशिक्षणाधिकारी,
उपशिक्षणाधिकारी या सर्वाचे सहकार्य लाभले असे मत माध्यमिक शिक्षणाधिकारी *डॉ एकनाथ आंबोकर* यांनी व्यक्त केले.🌹🌹🌹🌹🌹

  •  


Spread the news

You may also like

error: Content is protected !!