कोल्हापूर उत्तर, दक्षिण आणि करवीरमधील महायुतीचे उमेदवार हे विकासाचे शिलेदार
क्षीरसागर, नरके, महाडिक यांना विजयी करण्याचे युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांचे आवाहन
कोल्हापूर : ‘
कोल्हापूर उत्तर, दक्षिण आणि करवीरमधील महायुतीचे उमेदवार हे विकासाचे शिलेदार आहेत. त्यांना निवडून विकासाला आणखी गती देण्याचे आवाहन युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी केले. दरम्यान,
राज्यातील महायुती सरकारने नेहमीच लोकांच्या हिताच्या कारभार केला. कोल्हापूरसाठी भरीव निधी दिला. कोल्हापुरातील तरुणांना रोजगाराच्या संधी, येथील टॅलेंटला वाव मिळावा यासाठी कोल्हापुरातील शेंडा पार्क येथे ३५ एकर जागेवर आयटी पार्क, पंधरा एकर जागेवर टेक्नॉलॉजी सेंटर उभारण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील महायुतीच्या दहाही उमेदवारांना निवडून द्या.’असे आवाहन कोल्हापूर उत्तरचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांनी केले.
यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्या पुढाकारातून कोल्हापूर उत्तरचे उमेदवार राजेश क्षीरसागर, कोल्हापूर दक्षिणचे उमेदवार अमल महाडिक, करवीर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार चंद्रदीप नरके यांच्या प्रचारार्थ कोल्हापुरात महायुती युवाशक्ती मेळावा घेतला. गुरुवारी, सायंकाळी दसरा चौक येथे आयोजित या मेळाव्याला युवावर्गाची मोठी गर्दी होती. खासदार धनंजय महाडिक, शिवसेनेचे पदाधिकारी उदय सावंत, भीमा साखर कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक, माजी महापौर सरिता मोरे, युवा सेनेचे पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर, भाजपा महिला आघाडीच्या रुपाराणी निकम, अभिषेक बोंद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.
खासदार धनंजय महाडिक यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांच्यावर निशाना साधला. ‘उमेदवारी अर्ज माघारीवरुन छत्रपती कुटुंबांतील सदस्यांवर दम भरणाऱ्या सतेज पाटील यांनी महिला सन्मानाच्या गोष्टी करू नयेत. महाडिक परिवाराने नेहमीच महिलांचा सन्मान केला आहे. विविध सामाजिक उपक्रमांद्वारे महिलांची उन्नती साधण्यावर भर दिला आहे.’असे महाडिक म्हणाले. विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या जिल्ह्यातील सगळया उमेदवारांना निवडून द्या असे आवाहन त्यांनी केले.
यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक म्हणाले, ‘ महायुती सरकार सर्वच घटकासाठी काम करत आहे. तर महाविकास आघाडी म्हणजे लोकहिताच्या कामाला विरोध करणारी आघाडी आहे. कोल्हापूर उत्तर, दक्षिण आणि करवीरमधील महायुतीचे उमेदवार हे विकासाचे शिलेदार आहेत. त्यांना निवडून विकासाला आणखी गती देऊ. त्यांच्या माध्यमातून तरुणांच्यासाठी रोजगार निर्मिती, आयटी पार्क या कामांना प्राधान्य देऊ.’ देवराज नरके यांनी, महायुतीचे उमेदवार हे सक्षम आहेत. विकासकामांविषयी तळमळ आहे. सामान्य लोकांसाठी धावून जाणारी ही मंडळी आहेत. त्यांना निवडून देऊन विकासाला गती देऊ.’ उद्योजक सत्यजित जाधव म्हणाले, दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांनी राजर्षी शाहू महाराजांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारणीचे स्वप्न पाहिले होते. त्या स्वप्नपूर्तीसाठी आमदार जयश्री जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे.’ याप्रसंगी राष्ट्रवादीचे महेंद्र चव्हाण, विपुल भंडारे आदींची भाषणे झाली.
या सभेला स्थायी समितीचे माजी सभापती नंदकुमार मोरे, माजी नगरसेवक बाबा पार्टे, विजय सुर्यवंशी, राजसिंह शेळके, किरण शिराळे, किरण नकाते, संजय निकम, मारुती माने, उमा इंगळे, प्रदीप उलपे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महेश चौगले, सतीश धरपणकर, करण जाधव, महेश पाटील आदी उपस्थित होते.