कोल्हापूर फर्स्ट च्या कार स्टिकर्स चे अनावरण खास. शाहू महाराज यांच्या हस्ते संपन्न* …

Spread the news

*कोल्हापूर फर्स्ट च्या कार स्टिकर्स चे अनावरण खास. शाहू महाराज यांच्या हस्ते संपन्न* …

  1. U­

 

कोल्हापूर

  •  

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या दूरदृष्टीने विकासाची यशोगाथा नेहमीच लिहिलेल्या करवीरनगरी कोल्हापूर शहराच्या भविष्यातील सर्वांगीण विकासासाठी ‘कोल्हापूर फर्स्ट’ या फोरमची स्थापना ९ मार्च २०२५ रोजी कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेल्या जिल्ह्यातील १४ नामांकित संघटनांनी केली आहे.

याचाच एक भाग म्हणून आज दिनांक ३०/०३/२०२५ रोजी ऐतिहासिक भवानी मंडपात तुळजाभवानी मंदीर येथे कोल्हापूरचे खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या शुभहस्ते व मा. खासदार धनंजय महाडिक, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार राजेश क्षीरसागर, मा. मालोजीराजे छत्रपती, मा. सुरेन्द्र जैन, मा. सर्जेराव खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘कोल्हापूर फर्स्ट’ या कार स्टीकरचे अनावरण करण्यात आले.

कोल्हापूर शहराचा शाश्वत विकास करणे, कोल्हापूरचे ऐतिहासिक धार्मिक महत्त्व अबाधित ठेवून ‘नेक्स्ट जनरेशन’साठी अपेक्षित कोल्हापूर बनविण्यासाठी ‘कोल्हापूर फर्स्ट’ या फोरमचा मुख्य उद्देश असून तो साद्य करण्यासाठी आपण सर्वजण एकत्रितपणे काम करू अशी ग्वाही खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी दिली.

‘कोल्हापूर फर्स्ट’ च्या माध्यमातून कोल्हापूरचा सर्वांगीण विकासासाठी नक्कीच प्रत्यन करून अशी ग्वाही मा. खासदार धनंजय महाडिक यांनी दिली.

‘कोल्हापूर फर्स्ट’ माध्यमातून सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने मांडलेल्या मुद्यांवर एकत्रितपणे काम करू अशी ग्वाही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली.

कोल्हापूर फर्स्ट चे समन्वयक सुरेन्द्र जैन यांनी याप्रसंगी सर्वांचे स्वागत करून प्रास्तावित केले.

ते म्हणाले की ९ मार्च २०२५ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये १४ नामांकित संघटनांच्या पुढाकाराने कोल्हापूरचा शाश्वत विकास साध्य करण्यासाठी, कोल्हापूरचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व अबधित राखून नेक्स्ट जनरेशन ला अपेक्षित कोल्हापूर बनवण्यासाठी , कोल्हापूर फर्स्ट ची स्थापना केली गेली आहे त्यास कोल्हापूरकरांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.

कोल्हापूरच्या विकासासाठी कोल्हापूर फर्स्ट च्या माध्यमातून ११ विकासाचे विषय हाती घेण्यात आले असून आज गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर कोल्हापूर फर्स्ट कार स्टिकरचा अनावरण कार्यक्रमाने सुरुवात केली असलेचे नमूद केले.

स्टिकर अनावरण कार्यक्रमानंतर खासदार, आमदार तसेच उपस्थित संघटनांच्या प्रतिनिधींच्या कार्सवर कोल्हापूर फर्स्ट चे स्टिकर लावण्याचा प्रारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.

सदर कार्यक्रमास खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, मा. खासदार धनंजय महाडिक, मा.आमदार राजेश क्षीरसागर, मा.मालोजीराजे छत्रपती,सौ.मधुरिमाराजे, ‘कोल्हापूर फर्स्ट’ चे समन्वयक सुरेन्द्र जैन, सहसमन्वयक अॅड. सर्जेराव खोत तसेच मॅक चे अध्यक्ष मोहन कुशिरे, उपाध्यक्ष विठ्ठल पाटील,संचालक हरिश्चंद्र धोत्रे,केईए अध्यक्ष बाबासो कोंडेकर, कुशल सामाणी, हॉटेल मालक संघ अध्यक्ष उज्ज्वल नागेशकर, कोल्हापूर जिल्हा बार असो. उपाध्यक्ष निशिकांत पाटोळे, जाॅ.सेक्रेटरी राजू ओतारी, आयटी असो. अध्यक्ष प्रताप पाटील, उपाध्यक्ष विश्वजीत देसाई,राहुल मेंच, शांताराम सुर्वे, दि इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स अध्यक्ष अजय देशपांडे, जयदीप बागी, कोल्हापूर मेडिकल असो. अध्यक्ष डॉ. कडोलिकर,जितो चे नेमचंद संघवी, इन्स्टिटय़ुट ऑफ कंपनी सेक्रेटरी कोल्हापूर चॅप्टर अध्यक्ष जयदीप पाटील, उपाध्यक्ष स्वप्निल पाटोळे, माजी अध्यक्ष सचिन बिडकर तसेच जयदीप मोरे, विकास जगताप, शंतनू गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

‘कोल्हापूर फर्स्ट’ फोरम चे सहसमन्वयक अॅड. सर्जेराव खोत यांनी कार्यक्रमांचे आभार मानले.

‘कोल्हापूर फर्स्ट’ फोरमधील सहभागी संस्था-
कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन, शिरोली मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन, कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन, क्रीडा प्रतिष्ठान कोल्हापूर, मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ कागल-हातकणंगले, गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, कोल्हापूर हॉटेल मालक संघ, क्रिडाई कोल्हापूर, कोल्हापूर मेडिकल असोसिएशन, सी. आय. आय. साउथ महाराष्ट्र, आयटी असोसिएशन ऑफ कोल्हापूर, आयआयएफ कोल्हापूर चॅप्टर, असोसिएशन ऑफ आर्किटेक्टस् अँड इंजिनिअर्स, कोल्हापूर चार्टर्ड अकौंटंट्स सोसायटी, दि इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स, इन्स्टिटय़ुट ऑफ कंपनी सेक्रेटरी कोल्हापूर चॅप्टर या संस्थांनी कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र येत ‘कोल्हापूर फर्स्ट ‘ची स्थापना केली आहे.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!