- ⚙️ कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या *अध्यक्षपदी कमलाकांत कुलकर्णी* यांची, तर *उपाध्यक्षपदी श्रीकांत दुधाणे यांची सर्वानुमते निवड* ….
•—————————————-•
*कोल्हापूर दि. २६* : कोल्हापूर इंजिनिअरींग असोसिएशनच्या संचालक मंडळाची सभा संपन्न झाली.
या सभेत सन २०२५ – २६ करिता पुढील प्रमाणे पदाधिका-यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
अध्यक्षपदी कमलाकांत कुलकर्णी , उपाध्यक्षपदी श्रीकांतद दुधाणे , ऑन. सेक्रेटरी पदी कुशल सामाणी , खजिनदारपदी प्रसन्न तेरदाळकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
कोल्हापूर उद्यमवार्ताच्या मुख्य संपादकपदी संचालक नितीन वाडीकर यांची फेरनिवड करण्यात आली.
संचालक सचिन मेनन यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा संपन्न झाली.
निवडीनंतर सर्व नविन पदाधिका-यांचे उपस्थितांनी पुष्पगुच्छ देवून हार्दीक अभिनंदन केले.
माजी अध्यक्ष बाबासो कोंडेकर यांनी त्यांच्या कारकिर्दीतील सभासदांच्या व संस्थेच्या हिताचे कामकाज केलेचे सांगितले तसेच वर्ष भरात विविध समारंभ , सभा , सभासदांसाठीचे उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व संचालक , निमंत्रित सदस्य यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.
नुतन अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी यांनी भविष्यातील असोसिएशनच्या कार्याविषयी मनोगत व्यक्त केले तसेच अध्यक्षपदी निवड केलेबद्दल संचालक मंडळाचे आभार व्यक्त केले. सभासद उद्योजकांचे विषय आणि प्रश्न विविध शासकीय विभागाकडील योजना तसेच समस्या सोडविण्यासाठी कार्य सुरू आहे तो पाठपुरावा सुरू राहील असे म्हणाले.
यावेळी संचालक सचिन मेनन आणि दिनेश बुधले यांनी नूतन पदाधिका-यांना मनोगत व्यक्तकरून शुभेच्छा दिल्या.
कोल्हापूर उद्यम सोसायटीच्या संस्था गटातून आपल्या असोसिएशनचे संचालक अतुल आरवाडे यांची बिनविरोध निवड झालेबद्दल संचालक सचिन मेनन यांच्याहस्ते पुष्पगुच्छ देवून अभिनंदन करण्यात आले.
यावेळी सर्वश्री सचिन मेनन , कमलाकांत कुलकर्णी , बाबासो कोंडेकर , प्रसन्न तेरदाळकर , दिनेश बुधले , संजय अंगडी , नितीन वाडीकर , अतुल आरवाडे, हर्षद दलाल , अमर करांडे, अभिषेक सावेकर , कुशल सामाणी , प्रदीप व्हरांबळे , इ. उपस्थित होते.