मुख्यमंत्र्यांच्या विरोधात मंगळवारी कोल्हापूर बंद
हद्दवाढ कृती समितीचा निर्णय
कोल्हापूर
सर्वपक्षीय कृती समिती तर्फे कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीसाठी मंगळवारी तारीख 25 ला कोल्हापूर बंद ची हाक देण्यात आली आहे. महाराणा प्रताप चौकातील माजी महापौर आर के पोवार यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या कार्यालयात झालेल्या सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीत हा एकमताने हा निर्णय घेण्यात आला.
सकाळी साडेनऊ वाजता बिंदू चौकात सर्व नागरिकांनी आपापल्या टू व्हीलर सह हजर राहून तिथून शहरातील प्रमुख शहरातील प्रमुख रस्त्यातून फेरी काढून बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. यावेळी झालेल्या बैठकीत अनेक सर्वपक्षीय नेत्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या.
रिक्षा व टॅक्सी चालकांनी पासिग विलंब शुल्का विरुद्ध पुकारलेल्या बंदलाही कृती समितीने जाहीर पाठिंबा व्यक्त केला . कोल्हापूर सर्किट बेंच चा प्रश्नही मार्गी लावण्याचा यावेळी निर्णय घेण्यात आला .
सदर सर्वपक्षीय बैठकीत कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन अध्यक्ष ॲडवोकेट सर्जेराव खोत, माजी महापौर महादेवराव आडगुळे , मारुतीराव कातवरे बाबा पाटें , बाबा इंदुलकर, कॉम्रेड दिलीप पवार रघुनाथ कांबळे सतीश चंद्र कांबळे , पद्माजा तिवले, अशोक भंडारी , मुसा भाई कुलकर्णी , बाबुराव कदम, संभाजीराव जगदाळे , सुनील देसाई, किशोर घाडगे, अनिल घाडगे तसेच इतर अन्य मान्यवर कार्यकर्ते नेते उपस्थित होते. बंद मधून अत्यावशक वगळण्याचा निर्णय घेण्यात आला