केआयटीमध्ये इनोव्हेशन व उद्योजकता या विषयावर कार्यशाळेचे आयोजन. एआयसीटीई व शिक्षण मंत्रालयाचा पुढाकार

Spread the news

 

 


केआयटीमध्ये इनोव्हेशन व उद्योजकता या विषयावर कार्यशाळेचे आयोजन.

  •  

एआयसीटीई व शिक्षण मंत्रालयाचा पुढाकार

येथील केआयटी अभियांत्रिकी (प्रदत्त स्वायत्त) महाविद्यालयाच्या इनोव्हेशन अँड रिसर्च फाउंडेशन यांच्यावतीने अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद एआयसीटीई व शिक्षण मंत्रालयाच्या इनोव्हेशन सेल यांच्या संयुक्त विद्यमाने एका विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे. ‘इनोव्हेशन आणि उद्योजकता’ या विषयाला घेऊन होणारी ही कार्यशाळा ऑफलाइन स्वरूपात असणार आहे. देशभरातील १६०० संस्थांमधून केवळ ५० संस्थांची निवड करण्यात आली असून महाराष्ट्रातील फक्त ४ संस्थांपैकी केआयटी ही एक संस्था आहे अशी माहिती केआयटीचे संचालक डॉ.मोहन वनरोट्टी यांनी दिली .

५ दिवसीय कार्यशाळेमध्ये इनोव्हेशन स्टार्टप्स, उद्योजकता, याचबरोबर बिजनेस मॉडेल ,प्रॉडक्ट मार्केट फिट, सेल्स स्ट्रॅटेजी, मार्केटिंग, फायनान्स आणि आयपीआर या विषयावरती विशेष सत्रांचे आयोजन केलेले असणार आहे. टेक्नॉलॉजी ट्रान्सफर व स्टार्टअप इंक्युबेशन या विषयावरही संशोधन व उद्योजक क्षेत्रातील नामांकित व्यक्तींबरोबर विशेष संवादाचे आयोजन या कार्यशाळेत करण्यात आले आहे. कार्यशाळेत विविध शैक्षणिक संस्थांमधील उद्योजकता व्यासपीठात काम करणारे, जबाबदारी असणारे प्राध्यापक,विद्यार्थ्यांना स्टार्टअप, हकेथॉन साठी मार्गदर्शन करणारे शिक्षक,उद्योजकता क्षेत्रात रुचि असणारे प्राध्यापक अशा लोकांनी सहभागी व्हावे असे आवाहन केआयटीच्या इनोव्हेशन अँड रिसर्च फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.सुधीर आरळी यांनी केले आहे.

संपूर्णतः मोफत असणारी ही कार्यशाळा केआयटी कॉलेजमध्ये संपन्न होणार असून फक्त ५० शिक्षकांचीच निवड आयोजकांच्या माध्यमातून केली जाणार आहे. कार्यशाळेच्या शेवटी एआयसीटीई व शिक्षण मंत्रालयाच्या इनोव्हेशन सेल यांच्या वतीने सहभागी प्राध्यापकांना ‘सहभाग प्रमाणपत्र’ दिले जाणार आहे. या कार्यशाळेच्या आयोजना साठी संस्थेचे अध्यक्ष श्री.साजिद हुदली,उपाध्यक्ष श्री. सचिन मेनन ,सचिव श्री. दीपक चौगुले यांचे प्रोत्साहन लाभले.

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!