केआयटी अभियांत्रिकी (स्वायत्त) महाविद्यालयाला शिवाजी विद्यापीठाने एम्पॉवर्ड ऑटोनॉमी महाविद्यालयाचा दर्जा
कोल्हापूर
येथील केआयटी अभियांत्रिकी (स्वायत्त) महाविद्यालयाला शिवाजी विद्यापीठाच्या विद्या परिषदेच्या शिफारशीवरून व्यवस्थापन परिषदेने ‘एम्पावर्ड ऍटॉनॉमी’ महाविद्यालयाचा दर्जा प्रदान केला आहे. यानुसार आता केआयटीला शिवाजी विद्यापीठ व महाविद्यालयाची जॉईंट डिग्री पदवी प्रदान करता येईल.राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या तत्त्वानुसार केआयटी महाविद्यालय भविष्यात स्वत:ची पदवी बहाल करण्यासाठी मार्गक्रमण करणार आहेत.
शिवाजी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ.डि.टी.शिर्के, उप-कुलगुरू डॉ.पी.एस.पाटील, कुलसचिव डॉ.व्ही.एन. शिंदे तसेच अन्य व्यवस्थापन परिषद सदस्य यांच्या उपस्थितीत अशा आशयाचे पत्र देऊन केआयटीला सन्मानित करण्यात आले.यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. सुनील कुलकर्णी,जेष्ठ विश्वस्त श्री.सचिन मेनन ,श्री. भरत पाटील व रजिस्ट्रार डॉ.मनोज मुजुमदार उपस्थित होते.
प्रतिक्रिया :-
‘एम्पॉवर्ड ऍटॉनॉमी’ मुळे केआयटी महाविद्यालयास आगामी काळामध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करणे आता सोपे जाणार आहे. महाविद्यालयाच्या शैक्षणिक गोष्टींवरती आता जास्तीत जास्त केआयटी प्रशासनाचे नियंत्रण असणार आहे. अशा प्रकारच्या दर्जामुळे भविष्यात केआयटी च्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या तत्त्वानुसार अन्य राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जेदार संस्थांमध्ये सुद्धा सहजगत्या प्रवेश मिळून त्यांना क्रेडिट ट्रान्सफरची सुविधा मिळू शकते.
– डॉ.मोहन वनरोट्टी, संचालक केआयटी.