खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या संकल्पनेतून आज मंगळवार पासून कोल्हापूर विमानतळ ते कोल्हापूर शहर अशी शटल बस सेवा सुरू झाली. प्रवाशांच्या मागणीनुसार कोल्हापूर विमानतळ येथून सयाजी हॉटेल पर्यंत ही शटल बस सेवा सुरू करण्यात आलीय. या बस सेवेचा शुभारंभ कोल्हापूर विमानतळ प्राधिकरणचे संचालक अनिल शिंदे आणि विमानतळ सल्लागार समितीचे सदस्य तेज घाटगे यांच्या हस्ते करण्यात आला.कोल्हापूर टर्मिनल बिल्डिंगला एक वर्ष पूर्ण झाले आहेत. तसंच भारतीय विमानतळ प्राधिकरणाला तीस वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याच औचीत्य साधून, ही बस सेवा सुरू करण्यात आली. कोल्हापूरात येणाऱ्या पर्यटकांना विमानतळ ते शहरामध्ये येण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसल्यान अनेक प्रवाशाकडून या ठिकाणाहून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू करावी अशी मागणी होत होती. त्याची दखल घेऊन खासदार शाहू महाराज यांनी, स्वखर्चाने ही बस सेवा सुरू केली. कोल्हापूर विमानतळ ते सयाजी हॉटेल या मार्गावर ही वाहतूक सेवा विमानाच्या वेळेत दररोज सुरू राहणार आहे. विमानतळाहून अन्य ठिकाणी जाणाऱ्या विमानांच्या अगोदर सयाजी हॉटेल येथुन ही बस विमानतळाकडे मार्गस्थ होईल.
प्रवासाच्या मागणीनुसार खासदार शाहू महाराज यांच्या विशेष प्रयत्नातून ही बस सेवा सुरू करण्यात आले. विमानाच्या आगमन व प्रस्थापन या वेळेत ही बस कोल्हापूर टर्मिनल मधून सोडण्यात येणार आहे. तरी याचा लाभ प्रवाशांनी घ्यावा.