केशवराव भोसले पुनर्बांधणी वर खासदार शाहू छत्रपतींची समिती लक्ष ठेवणार
जसे आहे तसेच उभारणार नाट्यगृह, पालकमंत्री हसन मुश्रीफ
कोल्हापूर : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाची पुनर्बांधणीचा विषय पोरखेळ नसून गांभीर्याने घेण्याचा आहे राज्य सरकार त्याला मोठा निधी देईल पण त्याचबरोबर लोकवर्गणीचा हातभार लागला तरीही वावगे ठरणार नाही अशी भूमिका खासदार शाहू छत्रपती यांनी मांडली .नाट्यगृहाची उभारणी पूर्वीप्रमाणेच केली जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी देत खासदार शाहू छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली समितीला शासनाची मान्यता असेल. ही समिती नाट्यगृहाची उभारणी काळजीपूर्वक व लक्षपूर्वक करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
खासदार शाहू छत्रपती यांनी संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह उभारणीबाबत आयोजित केलेल्या बैठकीमध्ये लोकप्रतिनिधींसह रंगकर्मी, आर्किटेक्ट, इंजिनियर, उद्योजक ,व्यापारी यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांनी नाट्यगृह उभारणी बाबत सूचना केल्या. एक वर्षाच्या आत नाट्यगृहाची उभारणी करावी, अशी मागणी ही उपस्थित सर्वांनी केली. शासकीय विश्रामगृहावरील राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या बैठकीला खासदार धनंजय महाडिक, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, माजी आमदार के. पी. पाटील , देवल क्लबचे अध्यक्ष व्ही.बी. पाटील, तालीम संघाचे सचिव माजी महापौर महादेवराव आडगुळे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांची प्रमुख उपस्थिती होती.
रंगकर्मी आनंद काळे यांनी केशव भोसले नाट्यगृह हे कोल्हापूरची संस्कृती असून ते मूळ स्वरूपात जसेच्या तसे झाले पाहिजे अशी सर्व रंगकर्मींची मागणी आहे. नाट्यगृहाची पुनर्बांधणी करताना त्याची आसनक्षमता पूर्वी इतकीच साडेसातशे व्हावी याकडेही त्यांनी लक्ष वेधले. नाट्य दिग्दर्शक किरण चव्हाण यांनी केशवराव भोसले नाट्यगृह हा नाट्यकर्मीसह सर्वांचा हुंकार असून त्याची बांधणी पूर्वीप्रमाणेच झाली पाहिजे अशी आग्रही मागणी केली. प्रसाद जमदग्नी म्हणाले शाहू महाराजांची आम्ही माफी मागितली पाहिजे. कारण आम्ही दुसरे नाट्यगृह बांधू शकलो नाही आणि त्यांनी बांधलेले नाट्यगृह जतन करू शकलो नाही. नाट्यगृहाची उभारणी करताना विलंब न करता आठ ते पंधरा दिवसात काम सुरू करावे. जर हे काम पुढे बंद पडले तर नाट्य व्यवसायावर आधारित अनेक लोकांची कुटुंबे उपाशी राहतील याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
नाट्यकर्मी सुनील घोरपडे यांनी नाट्यगृह अत्याधुनिक आणि सुरक्षित व्हावे. तसेच ते पूर्वीप्रमाणे झाले पाहिजे आणि बांधकाम लवकर सुरू झाले पाहिजे अशी मागणी केली. हर्षल सुर्वे यांनी यापूर्वी झालेल्या नूतनीकरणाच्या कामांमध्ये काही त्रुटी राहिल्या होत्या याकडे लक्ष वेधत ह्या त्रुटी दूर करण्यासाठी नाट्य क्षेत्रातील लोकांची समिती नेमावी अशी सूचना केली. आर्किटेक्ट मोहन वायचळ यांनी केशवराव भोसले नाट्यगृह सर्व सोयीने युक्त व्हावे कलाकारांच्या राहण्याची सोय व्हावी. कलावंतांच्या तालमीसाठी छोटे सभागृह असावे अशा सूचना केल्या.
डॉक्टर रमेश जाधव म्हणाले, राजेर्षी शाहू महाराजांच्या हात लागलेल्या आणि सांस्कृतिक वारसा असलेले केशवराव भोसले नाट्यगृह पूर्वीप्रमाणेच झाले पाहिजे. नाट्यगृह उभारणीसाठी जी समिती कराल त्यात निष्कारण खोगीर भरती करू नका. तज्ञ लोकांची नियुक्ती करा, अशा सूचना केल्या. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष माजी महापौर आर. के. पोवार यांनी नाट्यगृह उभारणीचे टेंडर प्रसिद्ध व्हावे पण त्यामध्ये तोड पाण्याची सूचना होता कामा नये अशी मागणी केली. नाट्यगृह पुनर्बांधणीच्या वेळेला सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्हीची सोय करावी अशी मागणी गिरीश फोंडे यांनी करत त्यांनी पाच हजार रुपयाची देणगी ही जाहीर केली.
महादेवराव आडगुळे म्हणाले, केशवराव भोसले नाट्यगृह आणि खासबाग मैदानाची उभारणी राजर्षी शाहू महाराजांनी केली आहे. दोन्ही इमारती या कोल्हापूरच्या सांस्कृतिक वारसा आहेत. केशवराव भोसले नाट्यगृहाची घटना दुर्दैवी घडली पण त्याचबरोबर खासबाग मैदानाकडे लक्ष न दिल्यास ते नामशेष होईल अशी भीतीही व्यक्त केली नाट्यगृह आणि कुस्ती मैदान या दोन्ही वस्तूंचे संवर्धन झाले पाहिजे अशी मागणी ही त्यांनी केली. राजर्षी शाहू महाराजांच्या यांनी उभारलेल्या सर्व वास्तू या आपण जतन करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे अशी मागणी वसंतराव मुळीक यांनी केली. केशवराव भोसले नाट्यगृहाचे झालेली घटना अत्यंत वेदनादायी असून कोल्हापुरातील उद्योग क्षेत्र नाट्यगृहाच्या उभारण्यासाठी सर्वतोपरी मदत करेल, अशी ग्वाही उद्योजक सुरेंद्र जैन यांनी दिली.
यावेळी अजय कोराने, माजी नगरसेवक सत्यजित कदम, इतिहास अभ्यासक राम यादव ,प्राध्यापक महादेव नरके, आर्किटेक्ट आणि इंजिनिअर असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराने, कॉम्रेड सतीश कांबळे, एडवोकेट धुमाळ, विजय कोराणे, बाबा इंदुलकर, दिलीप देसाई पंडित कंदले .यांनीनाट्यगृह पूर्वीप्रमाणे उभारलेपाहिजे अशी आग्रही मागणी केली.
आर्किटेक्ट इंद्रजीत नागेशकर यांनी नाट्यगृह उभारणीसाठी हेरिटेज आणि आर्किटेक्ट मधील तज्ञांची एक सेमिनार आयोजित करावा अशी सूचना केली. माजी खासदार संभाजी राजे म्हणाले, नाट्यगृह उभारणी करताना कॉन्झर्व्हेटिव्ह आर्किटेक्टची नियुक्ती
माजी खासदार संभाजी राजे म्हणाले, नाट्यगृह उभारणी करताना कॉन्झर्व्हेटिव्ह आर्किटेक्टची नियुक्ती केली पाहिजे. उभारणीच्या कामावर लक्ष देण्यासाठी तज्ञांची समिती स्थापन करावा. तसेच नवीन टेक्नॉलॉजीचाही वापर करावा. नाट्यगृहाच्या उभारणीसाठी निधीची चिंता करू नका असे सांगत खासदार धनंजय महाडिक यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या पदस्पर्श झालेले संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचे बांधकाम आहे त्या स्थितीत झाले पाहिजे असे मत व्यक्त केले.
आमदार ऋतुराज पाटील यांनी शाहू छत्रपती यांच्या नेतृत्वाखालील आमदारांनी नाट्यगृह उभारण्यासाठी पाच कोटी रुपये जाहीर केले असून हा निधी खर्च करण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना केली. नाट्यगृहातील दुर्घटनेतील दोषीवर कारवाई करावी अशी मागणी जयश्री जाधव यांनी करत नाट्यगृह मूळ स्वरूपात लवकरात लवकर व्हावे अशी मागणी केली. तसेच केशवराव भोसले यांचा पुतळा ही नाट्यगृहाच्या परिसरात उभा करावा अशी सूचना ही त्यांनी केली. शाहू छत्रपती यांची वन मॅन कमिटी स्थापन करावी अशी मागणी माजी आमदार संजय बाबा घाटगे यांनी केली. या कमिटीत तज्ञांना निमंत्रित करावे अशी सूचना ही केली. उपस्थितांची मते जाणून घेतल्यानंतर शाहू छत्रपती म्हणाले, नाट्यगृह उभारणी बाबत भिन्न भिन्न विचार असले तरीही नाट्यगृह पूर्वीप्रमाणेच उभारावे, अशी मागणी एकमताने झाली आहे .पण त्याचबरोबर नाट्यगृह उभारणी करताना डिझास्टर मॅनेजमेंटकडे लक्ष देण्याची गरज आहे. माझ्या नेतृत्वाखाली जरी समिती नेमली तरी आम्हाला वॉच डॉग प्रमाणे भूमिका घ्यावी लागेल. नाट्यगृहाची उभारणी हा पोरखेळ नसून गांभीर्य घेणे घेण्याची गोष्ट आहे. नाट्यगृह उभारणीसाठी नाट्यकर्मी ,आर्किटेक्ट ,इतिहास संशोधक यांची मदत होणारच आहे. पण त्याचबरोबर शासनाच्या निधी बरोबर लोकवर्गणीही स्वीकारण्यास हरकत नसल्याचे त्यांनी सांगितले. दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराजांचा भव्य पुतळा हा लोकवर्गणीतून झाला आहे याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, महानगरपालिकेने नाट्यगृह उभारणीसाठी २५ कोटी रुपये खर्च येण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे शासनाने २० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून पाच कोटी रुपये हे विम्यातून उपलब्ध होणार आहेत. हे काम लवकर व्हावे अशी इच्छा माझ्यासह सर्वांची आहे. पण आचारसंहितेचा अडथळा असल्याने त्यातून मार्ग काढावा लागेल. त्यासाठी शॉर्ट टेंडर काढावे लागेल महानगरपालिकेने सात दिवसात टेंडर काढले आणि त्याला नगरविकास खात्याची परवानगी मिळाली तर काम लवकर सुरू होईल. रा. शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखालील होणाऱ्या समितीला शासन मान्यता दिली जाईल. ही समिती नाट्यगृहाच्या उभारणीबाबत लक्षपूर्वक काम करेल. नाट्यगृह उभारणीसाठी निधी कमी पडणार नाही. तसेच पूर्वीप्रमाणे जशेच्या तसे नाट्यगृहाची उभारणी होईल ,अशी ग्वाही त्यांनी दिली. सूत्रसंचालन अनिल घाटगे यांनी केले.
चौकट.
मुश्रीफ साहेब मी तुमच्या अंगावर येणार, संभाजी राजे. आजच्या बैठकीमध्ये खासदार संभाजी राजे यांनी अभ्यासपूर्ण सूचना केल्या. रायगड उभारणीबाबत आलेले अनुभव त्यांनी कथन केले. राज्य सरकार किती निधी देईल हे पाहिले जाईल. नाट्यगृहाची उभारणी करताना काही चूक झाली तर मी खासदार शाहू छत्रपती यांना विचारू शकत नाही .पण या कामात दोन ते पाच टक्के कमिशन चालणार नाही. असे झाले तर मी तुमच्या अंगावर येणार असा इशाराही त्यांनी दिला.