करवीरच्या बहिणीनी ठरवलंय चंद्रदीप नरकेच आमदार- शारदा जाधव क.बीड तालुका करवीर येथे हजारो महिलांच्या उपस्थितीत

Spread the news

करवीरच्या बहिणीनी ठरवलंय चंद्रदीप नरकेच आमदार- शारदा जाधव
क.बीड तालुका करवीर येथे हजारो महिलांच्या उपस्थितीत महिला मेळावा.
– लाडकी बहीण योजनेतून करवीर विधानसभा मतदार संघात 93 हजार महिला भगिनींना मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेद्वारे चंद्रदीप नरके यांनी लाभ मिळवून दिला आहे. गट तट न पाहता सर्व सामान्यांच्या सुखदुःखात सामील होणारा भाऊ म्हणून करवीर विधानसभा मतदारसंघातील लाडक्या बहिणीनी चंद्रदीप नरके यांना आमदार करण्याचे ठरवले आहे असे पक्षनिरीक्षक शारदा जाधव यांनी सांगितले.
कसबा बीड येथे झालेल्या सांगरूळ जिल्हा परिषद मतदार संघातील महिला मेळाव्यात शारदा जाधव बोलत होत्या. अध्यक्षस्थानी कोगेच्या सरपंच अर्चना पाटील होत्या.यावेळी राजलक्ष्मी नरके शैलजादेवी नरके यांचे प्रमुख उपस्थिती होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणती योजना आणली तर नाकमुरवडणाऱ्या महाविकास आघाडीने निवडणुकी येताच मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेने तिजोरी रिकामी होणार असे म्हणणारे आता लाडक्या बहिणींना तीन हजार देणार असे अमिष दाखवायला सुरु केले आहे.मुख्यमंत्र्यांनी एसटी प्रवासात महिलांना ५० टक्के सवलत दिल्यानंतर एसटी तोट्यात जाणार असा कांगावा करणाऱ्या विरोधी महाविकास आघाडीला एसटीत महिलांना दिलेल्या सवलतीमुळे कोट्यावधीत फायद्यात आल्याने आता कोणताच मुद्दा नाही. मागील पाच वर्षात चंद्रदीप नरके या वाघाला खिंडीत पकडण्याचा डाव झाला.पण आता या बहिणीच्या आशीर्वादाने चंद्रदीप नरके घासून नाही तर ठासून मताधिक्याने विजय होणार. आमदार आणि नामदार ही होणार असे सांगितले.
महिला जिल्हाध्यक्ष शुभांगी पोवार म्हणाल्या चंद्रदीप नरके कामाचा माणूस आहे सर्वसामान्यांच्या सुखदुःखाबरोबर विकासाचा धडाका लावणारा कार्यकर्ता आहे हे ओळखून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी चंद्रदीप नरके यांची पहिल्या यादीतच उमेदवारी जाहीर करून कोहिनूर हिऱा शोधून काढला असे सांगितले.
यावेळी कोगे सरपंच अर्चना पाटील,कुडित्रे सरपंच ज्योत्स्ना पाटील सुधाताई पाटील डॉक्टर सुमित्रा पाटील देविका नरके-फाटक, गायत्री चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केली.अनिता उत्तम वरूटे, धनश्री पाटील,ललिता बाटे उपस्थित होत्या. क्षीरसागर यांनी आभार मानले.
चौकट
चंद्रदीप नरकेंच्या विजयाच्या घोषणेने परिसर दुमदुमला- चंद्रदीप नरके यांच्या प्रचारार्थ कसबा बीड येथील महालक्ष्मी हॉलमध्ये आज सांगरूळ जिल्हा परिषद मतदार संघातील जवळपास चार ते पाच हजार महिलांचा मेळावा झाला. या मेळाव्यात महिलांच्या मधील उत्साह ओसंडून वाहत होता चंद्रदीप नरकेच्या विजयाच्या घोषणेने परिसर दुमदुमून निघाला


Spread the news

You may also like

error: Content is protected !!